Shambhuraj Desai, Aditya Thackeray
Shambhuraj Desai, Aditya Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : आदित्य ठाकरेंच्या सभेचे रेकॉर्ड मंत्री शंभूराज देसाई मोडणार....

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड : कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर ‌शंभूराज देसाई येत्या रविवारी (ता. १४) प्रथमच पाटण मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयार केली आहे. युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली होती. त्यांच्यानंतर मंत्री देसाई यांची जाहीर सभा होत असून आदित्य ठाकरेंच्या सभेचे गर्दीचे रेकॉर्ड देसाईंच्या सभेत मोडले जाणार आहे. त्यामुळे देसाईंच्या शक्तीप्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच मंत्री शंभूराज देसाई पाटण मतदारसंघात येत्या रविवारी येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात मंत्री देसाई यांचे कऱ्हाड तालुक्यातील वारुंजी फाटा येथून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यापर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.

त्यानिमित्ताने गाड्यांची रॅलीही होणार आहे. त्यानंतर दौलतनगरला जाहीर सभा होणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटात नियोजनासाठी बैठकीचे कार्यकर्त्यांनी आयोजन केले‌ आहे. विजयनगर सुपने ते मरळी कारखाना या दरम्यान प्रत्येक गावात मंत्री देसाई यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच देसाई येत असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे.

पाटण तालुक्यात स्वागताचे बॅनर्स तयार करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. कारखाना कार्यस्थळावर जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने पाटण तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ येथे जाहीर सभा झाली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटात बंडखोरी केल्यानंतर प्रथमच मंत्री झालेल्या देसाई यांची‌ जाहीर सभा होणार असून, ते काय बोलणार याकडे पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT