Dr. Suresh Khade In Sangali Meeting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Mahapalika News : डॉ. सुरेश खाडेंनी दिले महापालिका कामगारांना नववर्षाचे गिफ्ट

Umesh Bambare-Patil

Sangali Mahapalika News : महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणार्‍या कंत्राटी, बदली, मानधन तसेच रोजंदारी कर्मचार्‍यांचे समावेशन महापालिकेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील बदली, रोजंदारी आणि मानधनावरील कर्मचार्‍यांना पालकमंत्र्यांकडून नववर्षाचे गिफ्ट मिळणार आहे.

सांगली येथील Sangali Mahapalika महानगरपालिका मुख्यालयात पालकमंत्री खाडे Suresh Khade यांनी महापालिकेत कामगारांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त स्मृती पाटील, माजी सभापती सुरेश आवटी आदी उपस्थित होते. महापालिका कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे यानी

मंत्री खाडे म्हणाले, आपल्या बैठकीपूर्वीच महापालिकेने कर्मचार्‍यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला आहे. तो प्रस्ताव शासन दरबारी असला तरी तोच प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा शासनाकडे सादर करावा असे आदेश त्यांनी दिले. .

महापालिकेकडून आलेल्या फेर प्रस्तावास पुढील आठवड्यात संबधित विभागाशी चर्चा करून त्याबाबतची अंतिम बैठक तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जास्तीजास्त प्रयत्न करू, अशी ग्वाहीही पालकमंत्री खाडे यांनी सर्व कामगारांना दिली आहे. यावेळी आयुक्त सुनील पवार यांनीही महापालिका प्रशासनाने कामगारांच्या बाजूने असून कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी कामगारांच्या वतीने कामगार सभेचे सचिव विजय तांबडे आणि सहकार्‍यांनी पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांचा सत्कार केला.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

64 बालवाड्या होणार अंगणवाड्या

महापालिका क्षेत्रात असणार्‍या 64 बालवाडी या शासन आदेशानुसार अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रशासनाला केली. मनपा कर्मचारी समायोजन आणि बालवाडीचे अंगणवाडीत समायोजनबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT