BJP leaders Jaykumar Gore have intensified political efforts ahead of the August 4 Miraj Panchayat Samiti Chairperson election. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : सांगलीत जयंत-विशाल पाटलांना चितपट करण्याचा प्लॅन; जयकुमार गोरेंनी स्वतःच घेतली जबाबदारी

Jaykumar Gore targets Jayant Patil and Vishal Patil : मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी भाजपने सांगलीत राजकीय हालचाली वेगवान केल्या आहेत. चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या रणनीतीमुळे महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Rahul Gadkar

Sangli politics latest update: उरण ईश्वरपूर नगरपरिषदेत आणि मिरज पंचायत समितीत महाविकास आघाडीला धक्का मोठा धक्का बसला. आता पुन्हा एकदा भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना शह देण्याची खेळी खेळली जात आहे.

यासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्री जयकुमार गोरे यांचीही साथ मिळत आहे. आगामी काळात मिरज पंचायत समिती सभापतीपदी आणि जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवण्याची जबाबदारीच गोरे यांनी घेतली आहे. यामुळे 4 ऑगस्ट रोजी होत असलेल्या मिरज पंचायत समिती सभापती निवडीकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना "लवकरच मिरज पंचायत समितीत भाजपचा सभापती बसेल, " अशी ग्वाही दिली होती. एवढेच नव्हे तर, "जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती भाजपचा बसवण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा, ती मी पूर्ण करतो, " असे आश्वासनही त्यांनी दिले होते.

विशेष म्हणजे तेव्हा मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी दिला नव्हता. आता भाजपला अपेक्षित निर्णय आल्याने, निवडणूक पुन्हा होत असल्याने आणि गोरे यांनी स्वतः जबाबदारी खांद्यावर घेतल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप त्यातही जयंत पाटील-विशाल पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील-जयकुमार गोरे यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

मिरज पंचायत समिती सभापतीची १० मार्च रोजी निवडणूक झाल्यापासूनच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा टोकाचा संघर्ष आहे. मिरज पंचायत समितीत यापूर्वी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी आणि शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची उपसभापती म्हणून निवड झाली होती.

या आघाडीमुळे भाजपच्या हाती आलेला सभापतीपदाचा घास निसटला होता. या सत्तास्थापनेत खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार इद्रिस नायकवडी आणि शिवसेना नेते मोहन वनखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.  मात्र, ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवत ती रद्द करण्यात आली. निवडी रद्द झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT