Sangli News : सांगलीत पुन्हा सत्तेचा थरार! जयंत पाटील-विशाल पाटील पलटवाराच्या तयारीत : भाजप आमदारानेही बाह्या सरसावल्या

Miraj Panchyat Samiti : मिरज पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपदाची फेरनिवडणूक ४ ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे सुरेश खाडे आणि महाविकास आघाडीचे जयंत पाटील व विशाल पाटील यांच्या प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.
The Miraj Panchayat Samiti Chairperson and Vice-Chairperson re-election on August 4 is set to become a prestige battle between BJP and the Mahavikas Aghadi.
The Miraj Panchayat Samiti Chairperson and Vice-Chairperson re-election on August 4 is set to become a prestige battle between BJP and the Mahavikas Aghadi.Sarkarnama
Published on
Updated on

Miraj Panchyat Samiti : मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभपातीपदाचा पुर्ननिवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार येत्या ४ ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडीच्या निमित्ताने भाजप आमदार सुरेश खाडे यांची परीक्षा असणार आहे तर महाविकास आघाडीचे खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

चार महिन्यांपूर्वी झालेली मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभपातींची निवड पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकतीच रद्द ठरवली. त्यानंतर 4 ऑगस्ट या निवडी पुन्हा होणार आहेत. पण शासनाकडे अपिल करण्यासाठी वेळ असताना प्रशासनाकडून घाईघाईने सभापती निवडीची तारीख जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज प्रांताधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ४ ऑगस्ट रोजी मिरज पंचायत समिती कार्यालयात विशेष सभा आयोजित केली आहे. यात सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि त्यानंतर सभापती व उपसभापतीपदाची निवड अशी संपूर्ण प्रक्रिया होणार आहे.

विशाल पाटील - जयंत पाटील यांना दणका :

मिरज पंचायत समितीच्या २२ सदस्यीय सभागृहात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांच्या आघाडीकडे ११ सदस्य, तर भाजप-शिवसेना युतीकडेही ११ सदस्य होते. अशा परिस्थितीत १० मार्च रोजी सभापती निवडीच्या वेळी बुधगावचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिल्याने आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापती, तर ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली होती.

The Miraj Panchayat Samiti Chairperson and Vice-Chairperson re-election on August 4 is set to become a prestige battle between BJP and the Mahavikas Aghadi.
Sangli: सांगलीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जुंपली; जयंत पाटलांची आता थेट न्यायालयीन लढाईची तयारी

मात्र, सभापती निवडीपूर्वी पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक गैरहजर ठेवण्यात आल्याचा आरोप भाजप आणि मित्रपक्षांनी केला होता. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवाय भाजपच्या सदस्या राणी भोरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते.

या तक्रारीनंतर नुकतेच पुणे विभागीय आयुक्तांनी सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द केली आहे. पण या निर्णयाविरोधात शासनाकडे अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत बाकी असताना नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे. शिवाय शासनाने दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याची तयारीही विरोधकांनी केली आहे.

The Miraj Panchayat Samiti Chairperson and Vice-Chairperson re-election on August 4 is set to become a prestige battle between BJP and the Mahavikas Aghadi.
Miraj Panchayat Samiti : सांगली ZP अध्यक्ष निवडीआधी भाजपला मोठा धक्का : अजितराव घोरपडेंनी मिरज पंचायत समितीतील सुरेश खाडेंची सत्ता उलथवली

त्यानंतरही निवड कार्यक्रम जाहीर झाल्याने शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचा आरोप करत शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे नव्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीतील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून, विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे ४ ऑगस्टला होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com