Zilla Parishad member Snehal More has been assigned interim charge of Miraj Panchayat Samiti ahead of the August 4 Chairperson election. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Panchayat Samiti : भाजपने फिल्डिंग लावलेल्या पंचायत समितीची सुत्रे सुनेत्राताईंच्या राष्ट्रवादीकडे : सीईओंनीच दिला सभापतीपदाचा चार्ज

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडी रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या स्नेहल मोरे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

Rahul Gadkar

Miraj Panchayat Samiti :मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड विभागीय आयुक्तांनी रद्द ठरवल्यानंतर पंचायत समितीच्या कारभारासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्नेहल मोरे यांच्याकडे मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी याबाबतचे आदेश काढले असून, ४ ऑगस्ट रोजी सभापती व उपसभापती पदाची फेरनिवडणूक होणार आहे. मोरे यांच्या नियुक्तीने मिरज पंचायत समितीची सूत्र तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या एकत्रित आघाडीकडे आली आहेत.

यापूर्वी १० मार्च रोजी मिरज पंचायत समितीत यापूर्वी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी आणि शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची उपसभापती म्हणून निवड झाली होती. या आघाडीमुळे भाजपच्या हाती आलेला सभापतीपदाचा घास निसटला होता.

मात्र, ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवत ती रद्द करण्यात आली. नियमानुसार सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे एकाचवेळी रिक्त झाल्यास जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींपैकी एका सदस्याकडे पंचायत समितीचा तात्पुरता कारभार सोपविण्याची तरतूद असल्याने स्नेहल मोरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

जयकुमार गोरेंनी घेतली जबाबदारी :

४ ऑगस्ट रोजी होत असलेल्या सभापती आणि उपसभापती निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. मिरज पंचायत समिती सभापतीपदी आणि जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवण्याची जबाबदारी मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली आहे. यामुळे 4 ऑगस्ट रोजी होत असलेल्या मिरज पंचायत समिती सभापती निवडीकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT