MLA Kapil Patil-Nirmala Sitharaman Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aadhaar-PAN Link Fine : आधार-पॅन लिंक दंडावरून आमदार कपिल पाटलांचे निर्मला सीतारामन यांना पत्र...

सरकारनामा ब्यूरो

Mla Kapil Patil News : आधार-पॅन लिंक करण्यासाठी जो दंड आकारण्यात येत आहे, तो सर्वसामान्यांसाठी मोठा आहे. तसेच, बँकेत खात्यावर ठेवावी लागणारी कमीत कमी रक्कम या नावाखाली गरिबांची फसवणूक आणि पिळवणूक होत आहे. ती थांबवा, अशी विनंती करणारे पत्र जनता दलाचे (युनाइटेड) राष्ट्रीय महासचिव तथा आमदार आमदार कपिल पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना लिहिले आहे. (MLA Kapil Patil's letter to Nirmala Sitharaman on Aadhaar-PAN link fine)

आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पत्रात म्हटले आहे की, एका बाजूला गरिबांना सवलती दिल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. पण गरिबांच्या आधार कार्ड (Aadhaar) -पॅन कार्ड लिंक करण्यासाठी एक हजार रुपयाचा दंड भरावा लागत आहे. जो मध्यमवर्ग आहे, शिक्षित वर्ग आहे, त्यांनी यापूर्वीच आधार-पॅन लिंक केलेलं आहे. आता ज्यांचं आधार-पॅन लिंक करायचं राहिलं आहे, तो सगळा गरीब वर्ग आहे. त्यांच्यासाठी तुम्ही मदतवाढ दिली ही गोष्ट खरी असली तरी एक हजार एवढा भुर्दंड अन्यायकारक आहे.

म्हणजे एका घरात तीन, चार लोकं असतील तर किमान चार हजार जातात. कोणत्याही सामान्य कुटुंबाला हा खर्च कर्जात ढकलणारा आहे. मतदार नोंदणीसारखी ही निरंतर प्रक्रिया राबवावी. आधार-पॅन लिंकसाठी आकारण्यात येणारा एक हजाराचा दंड रद्द करावा. ज्यांनी तो भरला आहे, त्यांच्या त्यांच्या खात्यात पुन्हा एक हजार परत करावेत, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी अर्थमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे.

बँका मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली अतिरिक्त चार्जेस/दंड आकारत आहेत. गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांच्या बँक खात्यातील तुटपुंजी बचत ही मिनिमम बॅलन्समुळे अडकते. अडचणीत ती काढली, तर त्यावर दंड आकारला जातो. त्यामुळे गरीब, निम्न मध्यमवर्गीय संकटात आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी DBT अंतर्गत जे पैसे पालकांच्या बँक खात्यात येतात, ते पैसे बँकांच्या मिनीमम बॅलन्स आणि अतिरिक्त चार्जेसमध्ये उडून जातात. त्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.

हल्ली झिरो बॅलन्स सुविधा काही बँका देतात, ही पद्धत सरसकट सर्व बँकांनी अवलंबली पाहिजे. मिनिमम बॅलन्सच्या नावाने चाललेली गरिबांची अडवणूक थांबवावी, या मागणीचा पुनरुच्चार पाटील यांनी पत्रात केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT