Mahesh Shinde speaks on Satara ZP controversy, defending police amid political clash over leadership election. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics: आमदार महेश शिंदे म्हणतात, शिवसेनेच्या नव्हे, तर स्वत:च्या ताकदीवर निवडून आलो; मंत्री शंभूराज देसाईंनी ठणकावलं

Shivsena News: पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी बदलीपूर्वी त्यांच्या अधिकारात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार यांनी मला माहिती दिली आहे. त्यांनी त्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad News: आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत. सर्व शिवसैनिकांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतदान केले आहे. निवडून आल्यावर मी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो असं वक्तव्य करुन त्यांनी शिवसेनेच्या मतदारांचा अवमान करणं योग्य नाही. शिवसैनिक याचा नक्की विचार करतील, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार शिंदे यांना बुधवारी(ता.22) लगावला.

आमदार महेश शिंदे यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडून आलो आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर विचारले असता पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत. सर्व शिवसैनिकांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीवेळी मदत केलेली आहे. त्यांना मतदान केलेले आहे. निवडून आल्यावर मी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहे, असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं म्हटलं.

शिवसेनेचे निर्णय पालकमंत्री स्वतःला योग्य वाटेल ते घेतात असेही आमदार शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, शिवसेनेच्या ज्या विंग आहे, त्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला विचारले तरी त्यांच्याकडून अशी भावना कोणीही व्यक्त करणार नाही.

सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी चार वर्षे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिली आहे. मी सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात काम करत आहे. आमदार महेश शिंदे सोडले तर कोणाचीही अशी तक्रार दिसणार नाही.

शिंदेच निर्णय घेतील...

पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी बदलीपूर्वी त्यांच्या अधिकारात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार यांनी मला माहिती दिली आहे. त्यांनी त्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

मी ही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भावना कळवणार आहे. ते त्यासंदर्भातील निर्णय घेतील, असे मत पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT