Beed Crime News: वाल्मिक कराडच्या गँगची जेलमध्येही दहशत, सुदर्शन अन् प्रतिक घुलेनं कैद्याला हात मोडेपर्यंत चोपलं? व्हायरल ऑडिओ क्लिपनं खळबळ

Santosh Deshmukh Murder Case: एका वृत्तवाहिनेनं ही कथित ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी सहा नंबरच्या बराकीत सोबत असलेल्या एका कैद्याला बेदम मारहाण केली आहे. यात त्या कैद्याचा हात मोडल्याचे तो आपल्या नातेवाईकांना सांगतो आहे.
Walmik Karad
Walmik Karadsarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीतून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची दहशत जेलमध्येही असल्याचे समोर आले आहे. वाल्मिकसह बीडच्या कारागृहात कैद असलेल्या सुदर्शन, प्रतिक घुले यांनी एका कैद्याला बेदम मारहाण केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सरकारनामाने या ऑडियो क्लिपची पडताळणी केलेली नाही.

मारहाण झालेल्या कैद्याचं आपल्या नातेवाईकाशी झालेल्या संभाषणातून हा प्रकार समोर आल्याचे सांगितले जाते. एका वृत्तवाहिनेनं ही कथित ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी सहा नंबरच्या बराकीत सोबत असलेल्या एका कैद्याला बेदम मारहाण केली आहे. यात त्या कैद्याचा हात मोडल्याचे तो आपल्या नातेवाईकांना सांगतो आहे. जेलमधील पोलीस आरोपींना मिळालेले आहेत, मारहाण केल्याची तक्रार केली तरी ते लक्ष देत नाहीत, असा आरोपही संबंधित कैद्याने केला आहे.

बीड जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा अजहर अब्दुल पठाण या कैद्याने कथित आॅडिओ क्लीपमधून केला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर यांनी आपल्याला मारहाण केली आहे. यात माझा हात उखडला असून वरच्या बाजूचे हाड निघाले आहे, असा दावा या क्लीमध्ये करण्यात आला आहे.

जेलमधील पोलिस माझे ऐकत नाहीत ते त्यांच्याशी मिळालेले आहेत. त्यांनी मारहाण करणाऱ्यांकडून पैसे घेतले असल्यामुळे ते मला न्याय देत नाहीत. जेलरलाही सांगितले पण तो त्यांच्याच माणूस आहे. सुप्रीटेंडट चांदणे हे देखील माझे एकत नाहीत, उलट मलाच धमक्या देतात, तुला दुसऱ्या जेलमध्ये टाकू अशी भिती दाखवतात. माझ्या घरातील लोकांनाही धमक्या देतात, असा आरोप संबंधित कैद्याने केला आहे.

Walmik Karad
Tushar Doshi News: तुषार दोशींनी बदलीच्या दिवशीच मोठी चूक सुधारली; सातारा झेडपी राड्यातील पोलिस अधिकाऱ्याला दिला दणका

आमचे कोणी काही वाकड करू शकत नाही, तुझा संतोष देशमुख करून टाकील अशी धमकी त्यांनी दिली आहे. कोर्टाला सांगीतले तरी आमचे कोणीही काही वाकडं करू शकत नाही, असा दम ते मला देतात. मला झालेल्या बेदम मारहणीचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहेत. जागेवरून उठ म्हणत मला मारहाण झाली, ती कोणी केली, हे सगळं सीसीटीव्हीमध्ये असल्याचे त्या कैद्याने म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हा कारागृहामध्ये झालेल्या कथित मारहाण आणि ऑडिओ क्लिप संदर्भात कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी कारागृहात कैद्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची कबुली दिली आहे. सहा नंबरच्या बराकमध्ये हे सगळे कैदी होते. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.

Walmik Karad
Maharashtra Sugar Factory : दत्तामामा भरणे, संग्राम थोपटेंसह 7 बड्या नेत्यांना दिल्लीतून झटका : फडणवीस सरकारची फाईल पाठवली परत

परंतु, दोन्ही बाजूच्या कैद्यांनी आमची कुठलीही तक्रार नसल्याचे लेखी दिले असल्याचे सांगीतले आहे. मारहाणीचा कुठलाही प्रकार कारागृहात घडल नाही, असा दावा जेल प्रशासनाने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com