MLA Monica Rajale was taken into police custody
MLA Monica Rajale was taken into police custody Sachin Satpute
पश्चिम महाराष्ट्र

आमदार मोनिका राजळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

सचिन सातपुते

शेवगाव ( अहमदनगर ) : महाराष्ट्रात महावितरणकडून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत आहेत. या विरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपकडून आंदोलने होत आहेत. असातच भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनीही शेवगावमध्ये आंदोलन केले. MLA Monica Rajale was taken into police custody

महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा. या मागणीसाठी शेवगाव येथील गाडगेबाबा चौकातील महावितरण कार्यालयासमोर शेवगाव पाथर्डी रस्त्यावर आज (सोमवार) भाजपतर्फे आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे ही आजच महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

एकाच वेळी भाजप व वंचितच्या आंदोलनामुळे कार्यालय परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. तर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहनकोंडीचा फटका मोठया विवाहतिथीमुळे विवाहस्थळी जाणाऱ्या वर, वऱ्हाडी यांना देखील बसला. त्यात अडकून पडल्याने अनेकांचा विवाहमुहूर्त देखील टळला.

महावितरणचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल लोहारे व आमदार राजळे यांच्यामध्ये वीजबील भरण्यासंदर्भात तोडगा निघू न शकल्याने आंदोलन साडेतीन तास सुरुच राहिले. कायदा व सुवव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी अखेर दुपारी अडीच वाजता पोलिसांनी आमदार राजळेंसह 41 आंदोलकांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात नेल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी तयारी सुरू असतांनाच महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तालुक्यातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे पाणी असूनदेखील पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात भाजपने निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत महावितरणने निर्णय न घेतल्याने आमदार मोनिका राजळे यांनी आक्रमक होत कार्यकर्त्यांसह आज महावितरण कार्यालयासमोर शेवगाव पाथर्डी रस्त्यावर साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी राजळे म्हणाल्या की, यावर्षीच्या अतिवृष्टी व पुराच्या संकटातून कसेबसे बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार व महावितरणने एक प्रकारे कोंडीत पकडले आहे. पिकांच्या,जनावरांच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारचे व अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांवर दडपशाहीचे धोरण सुरू आहे. थकीत बिलाचे हप्ते पाडून सहमतीने निर्णय घेता आला असता मात्र फोनवर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे बोलणारे अधिकारी कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत.

यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लोहारे यांनी आमदार राजळे यांच्याशी चर्चा केली. मात्र काहीच तोडगा न निघाल्याने रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या राजळे व कार्यकर्त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या आदेशाने पोलीसांच्या वाहनातून ठाण्यात आणून सोडून देण्यात आले. त्यानंतर तब्बल साडेतीन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले, महेश फलके, संभाजी जायभाये, कचरु चोथे, गणेश कराड, भिमराज सागडे, तुषार पुरनाळे, वाय.डी कोल्हे, आशा गरड, रवी सुरवसे, अजिंक्य लव्हाट, राहुल बंब, संदीप खरड, नितीन दहिवाळकर, कासम शेख, सुभाष बरबडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

वंचितचे आंदोलन

थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात पाथर्डी रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर वंचिततर्फे राज्याचे उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी लोहारे यांनी पाच हजार रुपये भरल्यानंतर रोहीत्र सुरु करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले. मात्र चव्हाण यांनी पाच हजार रुपये दोन टप्प्यात भरु किंवा मार्चएडंला भरण्यात येतील. असे सांगून दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न केल्यास पुन्हा कार्यालयात जावून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात वंचीतचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, राजू नाईक, आजिनाथ आव्हाड, महादेव तुजारे, सुनीता जाधव, सागर गरुड, वसंत दळवी, शंकर हरवणे, संदीप आव्हाड, सोपान आव्हाड, सलीम जिलानी, रवींद्र सर्जे, रवी नीळ आदी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT