Monika Rajale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Monika Rajale : एकहाती सत्ता तरी मोनिका राजळेंचा कस लागणार; समर्थकांनीच वाढवली डोकेदुखी

Pathardi Kharedi Vikri Sangh : संघाच्या 17 जागांसाठी 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Pradeep Pendhare

---------

Ahmednagar Political News : पाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होईल. निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या मंगळवारी अंतिम दिवस आहे. संघाची बिनविरोधची परंपरा आहे. ती यावेळी राखली जाते की, नाही याकडे आता लक्ष लागले आहे. भाजप आमदार मोनिका राजळे संघ ताब्यात ठेवण्यासाठी काय राजकीय क्लृप्त्या वापरतात आणि त्या यशस्वी होतात का, हे उद्याच स्पष्ट होईल.

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून आमदार राजळे यांचे परंपरागत राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. ढाकणे यांनी आमदार राजळे यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने संघाचे सभासद कमी केल्याचा आरोप सुरूवातीलाच केला होता.

याबाबत न्यायालयात जाणार असल्याचा इशारा ढाकणे यांनी दिला होता. संघाच्या १७ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. रिंगणात असलेले उमेदवार हे बहुतांशी राजळे समर्थक आहेत. विरोधक बोटावर मोजण्याइतके असले, तरी त्यांना बळ आहे की, नाही हे उद्याच स्पष्ट होईल. तरी काही जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संघाच्या या निवडणुकीत नव्या-जुन्यांचा मेळ घालण्याचा राजकीय विचार आमदार राजळे यांच्या गोठ्यात सुरू आहे. हा मेळ बसणार की, नाही हे देखील उद्याच समजेल. तसे हे आव्हानच आमदार राजळे यांच्यासमोर आहे. खरेदी-विक्री संघाची सत्ता जवळपास वीस वर्षांपासून राजळे यांच्या ताब्यात आहे. संघाची आर्थिक परिस्थिती सुद्धा उत्तम आहे.

या निवडणुकीत विद्यमान चेअरमन बाळासाहेब अकोलकर यांनी उमेदवारी दाखल केलेला नाही. संघाची सत्ता हाती आल्यास आमदार राजळे (Monika Rajale) या कोणाच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ घालतात, याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात काही जण शड्डू ठोकून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीत संदीप पठाडे, संतोष भागवत, सिंधू साठे, अनिल गुगळे, सुनीता काटे, शिवाजी मोहिते, पुरुषोत्तम इजारे, शरद रोडी, भीमा जेधे, जयसिंग धस, प्रकाश गुंगे, उत्तमराव गर्जे, जे. बी. वांढेकर, भगवान आव्हाड, बाळासाहेब जिरेसाळ अशा अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. (Ahmednagar News)

हे सर्व जण आमदार राजळे यांचे कट्टर समर्थक आहेत. काही जुन्या संचालकांना पुन्हा संधी देतानाच काहींचा पत्ता आमदार राजळे यांना कट करावा लागणार आहे. आमदार राजळे यावर कसा मार्ग काढतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काही जागांवर उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत नसल्याने तिथे निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT