Devendra Fadnavis : अतुल भोसलेंचा 'तो' हट्ट अखेर फडणवीसांनी पूर्ण केलाच...

Atul Bhosle : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर प्रवेशदवार
Atul Bhosle, Devendra Fadnavis
Atul Bhosle, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता कराड दौऱ्यावर येणार आहेत. भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांचे आजोबा सहकारमहर्षी जयवंतराव (आप्पासाहेब) भोसले यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उदघाटन फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी कराड बाजार समितीकडून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाला राजकीय घडामोडी घडल्या होत्या.

कराड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 18 वे कृषी प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार होते. त्यामुळे आयोजकांकडून कराड शहरासह मुख्यमंत्री येणाऱ्या मार्गावर स्वागताचे मोठमोठे बॅनर लावले होते. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला होता. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द होण्यामागे राजकीय कारण असल्याचे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या दौऱ्याकडेही राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे.

Atul Bhosle, Devendra Fadnavis
Boycott Maldives : मोदींचा अपमान सहन करणार नाही; मालदीवची टूरच रद्द, साऊथच्या अभिनेत्याचा 'अँग्री' रोल

कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाची तयारी सुरू असून काही दिवसांपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अतुल भोसले यांना पत्रकारांनी उद्घाटक म्हणून कोण येणार असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर डॉ. अतुल भोसले यांनी आम्ही जोपर्यंत उद्घाटक फायनल होत नाही, तोपर्यंत सांगणार नाही. तसेच काहीजण मोठमोठे बॅनर लावून आततायीपणा करतात, असा टोलाही काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना नाव न घेता लगावला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीची पाहणी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले या कृषी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. 17) सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दिली.

Atul Bhosle, Devendra Fadnavis
Sambhajiraje : लोकसभेला संभाजीराजेंना आघाडीचे पाठबळ? कोल्हापूरसाठी असा आहे मास्टर प्लॅन...

कृषी प्रदर्शनात 11 देशातील तज्ज्ञ

या महोत्सवात 11 देशातील कृषी तज्ज्ञ येणार असून पशु, फुले व फळे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या महोत्सवामुळे या भागातील लोकांच्या कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्यासह राज्यभरातील विविध साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक व कृषी क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

शिवराज्याभिषेक संकल्पनेवर प्रवेशद्वार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्षे सर्वत्र साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात येत आहे. त्याचसोबत अयोध्या येथील सोहळ्यानिमित्त प्रभू श्री रामाची प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारली जाणार आहे. हे या महोत्सवाचे आगळे-वेगळे आकर्षण ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Atul Bhosle, Devendra Fadnavis
Vijay Shivtare : आता माझ्या प्रचाराला अजितदादा येतील; शिवतारेंचा कॉन्फिडन्स, पुरंदरचं गणित काय सांगतं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com