Praniti Shinde
Praniti Shinde सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

आमदार प्रणिती शिंदे म्हणतात, मोफत घर नको रे बाबा...

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : घरांसाठी बऱ्याच आमदारांची मागणी होती. अनेक आमदार ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना मुंबईत घरे नसतात. माझ्यासारखे काही आमदार आहेत ज्यांची मुंबईत घरे आहे. त्यामुळे त्यांना घराची गरज नाही. त्यामुळे घरे देताना अशा आमदारांची निवड करावी ज्यांच्याकडे मुंबईत घरे नाहीत, अशी मागणी कॉंग्रेस (Congress) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) यांनी ग्रामीण भागातील आमदारांना कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा गुरुवारी अधिवेशनात केली. ही घरे सर्वपक्षीय आमदारांना देण्यात येणार आहेत. मात्र, या निर्णयाला भाजप, मनसेनेसह काही व्यक्तींकडून विरोध केला जात आहे.

याबाबत बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, "मला या सदनिकेची गरज नाही उलट सध्या असलेल्या आमदार निवासाचा वापर माझ्या मतदारसंघातले रुग्ण, गरजू जेव्हा मुंबईत जातात तेव्हा त्याचा वापर करतात. त्याप्रमाणे ज्या आमदारांना ही घरे नको आहेत त्याचा वापर रुग्णासाठी, लोकांसाठी तसेच औषधोपचारासाठी वापरावा.

''आम्ही लोकांसाठी राजकारणात आलोय त्यामुळे ज्यांना गरज नाही त्यांनी घर घेणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मी इतर आमदारांना आवाहन करते की त्यांनी यावरील हक्क सोडावा. मुख्यमंत्री आणि मंत्रीमहोदयांना कळवणार आहे की मला हे घर नको आणि स्वइच्छेने मी हे देऊन टाकते,' असे म्हणत मुंबईत आमदारांना देण्यात येणारे स्विकारणार नसल्याची घोषणा प्रणिती शिंदे यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने युटर्न घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टि्वट करुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,'' असे स्पष्टीकरण आव्हाडांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT