Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : माफी मागा, अन्यथा मतदारसंघात फिरू देणार नाही; प्रणिती शिंदेंच्या विरोधात मराठा समाजाने बाह्या सरसावल्या..

Lok Sabha Election 2024: प्रणिती शिंदे मराठा समाजाला बदनाम करीत आहेत. त्यांची ही राजकीय स्टंटबाजी आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Solapur Political News : सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे रिंगणात आहेत. गुरुवारी रात्री त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. भाजप कार्यक्रत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

'ते मराठा आंदोलक (Maratha Reservation) नव्हते मराठा आंदोलकाच्या नावाने भाजपचे लोक मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन बदनाम करीत आहेत," असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. हा आरोप मराठा क्रांती मोर्चाने फेटाळला आहे.

आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) मराठा समाजाला बदनाम करीत आहेत. त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला. प्रणिती शिंदे यांची ही राजकीय स्टंटबाजी आहे, असे गायकवाड यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. प्रणिती शिंदे या मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. त्यांना मराठा समाजाने अडवले. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्या काल (गुरुवारी) पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात लोकप्रतिनिधींना गाव बंद आंदोलन सुरू आहे. गावबंदी असताना गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

गुरुवारी दुपारी पंढरपूर तालुक्यात आल्यानंतर त्यांना मराठा समाजाकडून जाब विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही गावबंदी करावी, अशी मागणी केली होती. त्या सरकोलीतून सोलापूरकडे येत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली.

त्यावेळी आपल्या गाडीवर भाजप (BJP) समर्थक लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. मराठा समाजाने पुकारलेल्या गावबंदीला प्रणिती शिंदेंनी समर्थन दिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT