Lok Sabha 2024 News : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Constituency 2024) उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) दिल्लीत ठाण मांडून आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर बुधवारी रात्री ते दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, काल (गुरुवारी) त्यांची भेट होऊ न शकल्याने आज (शुक्रवारी) भेटीची वेळ ठरणार आहे. या भेटीत अमित शाह काय निर्णय घेणार याकडे समस्त सातारकरांचे लक्ष आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीतील तिढा कायम आहे. हा तिढा सोडविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. याचा केंद्रबिंदू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान ‘सागर’ बंगला ठरले आहे.
बुधवारी रात्री खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर ते रात्रीच दिल्लीला रवाना झाले. काल (गुरुवारी) सकाळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती.
पण, त्यांना वेळ मिळाली नाही. त्यामुळे आज (शुक्रवारी) त्यांना भेटीची वेळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या उमेदवारीचा निर्णय झाला नाही. आज अमित शाह काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काल (गुरुवारी) सायंकाळी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांत बंद दाराआड तासभर चर्चा झाली. या वेळी शिवेंद्रसिंहराजेंनी सातारची जागा भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी केली. उमेदवार कोणीही असला तरी आम्ही त्याचे काम करू, असा शब्दही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, उदयनराजे सातारा लोकसभेच्या निर्णयासाठी दिल्लीत ठाण मांडून असून, त्यांच्या समर्थकांनी सध्या 'तेच उमेदवार तेच चिन्ह, छत्रपती उदयनराजे भोसले महायुतीचे उमेदवार' अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
त्यामुळे सातारची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपला सोडल्याची चर्चा होती. याबाबत पक्षीय पातळीवरून कोणताही दुजोरा दिला नाही. त्यामुळे सातारा मतदारसंघाचा तिढा कायम आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.