सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कल्याणशेट्टी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. (MLA Sachin Kalyanshetti appointed as Solapur district president of BJP)
दरम्यान, अक्कलकोटमधील बाबासाहेब तानवडे, बलभीम शिंदे, आणि शिवशरण दारफळे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. दारफळे यांनी तर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली हेाती.
माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचे आरोप केले होते. तसेच, त्यांचा बेडरुमधील व्हिडिओही व्हायरल झाला हेाता. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता. तेव्हापासून भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये विजयराज डोंगरे, धैर्यशील मोहिते पाटील, संतोष पाटील, शिवाजी कांबळे यांचा समावेश होता.
भारतीय जनता पार्टीने अखेर जिल्ह्यातील आमदार असलेल्या आपल्या मूळच्या कार्यकर्त्याला पसंती दिली आहे. त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, सोलापूर शासकीय विश्रामगृहावर येत्या दोन दिवसांत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कल्याणशेट्टी यांचा राजकीय प्रवास अतिशय भरारी घेणारा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे ते समजले जातात. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही ते निकटवर्तीय मानले जातात. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावचे सरपंच, भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष, त्यानंतर आमदार आणि आता थेट जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.