एकनाथ शिंदेंची मुंबई महापालिकेसाठी मोर्चेबांधणी; या आठ शिलेदारांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेहऱ्यांकडे महत्त्‍वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मुंबई (Mumbai) महानगरपालिका निवडणुकीच्या (corporation election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख; तर तीन विभाग संघटकांवर पक्षबांधणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Appointment of five department heads and organizers in Mumbai from Eknath Shinde group)

मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेहऱ्यांकडे महत्त्‍वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी; तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी; तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नव्याने या नियुक्त्या जाहीर झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षविस्तारासाठी नवीन बळ मिळणार आहे.

 Eknath Shinde
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

या बैठकीला खासदार आणि शिवसेना सचिव राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव, शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना सचिव संजय मोरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 Eknath Shinde
‘शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला; पण...’

हे असतील महत्वाचे शिलेदार

दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक १० मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी; तर प्रिया गुरव यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक सातमधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी; तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक नऊमधून माजी नगरसेवक मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी; तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक १२ मधून दिलीप नाईक यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक नऊ येथून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 Eknath Shinde
'त्या' नादात तुम्ही लवकरच रनआऊट व्हाल : राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना टोला

या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली असून त्यांना पक्षविस्ताराचे काम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com