Sadabhau Khot On Gulabrao Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot On Gulabrao Patil : मंत्री गुलाबरावांची भाजप 'विकेट' घेण्याच्या तयारीत; हर्षलच्या आत्महत्याप्रकरणात सदाभाऊंकडून राजीनाम्याची मागणी

Sadabhau Khot Seeks Shivsena Gulabrao Patil Resignation in Harshal Patil Suicide : शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येत चुकीची माहिती देण्यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे.

Pradeep Pendhare

Harshal Patil suicide case : महायुतीनिमित्ताने आता एकमेकांविषयी निमित्त होऊ लागलं आहे. मंत्री, आमदार, पदाधिकारी अन् कार्यकर्ते एकमेकांना वेठीस धरण्याची एकही संधी सोडतान नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेल्या आत्महत्येनंतर, त्यांच्याविषयी दिलेल्या माहितीवरून तोंडघशी पडले आहेत.

त्यावरून आता विरोधक आक्रमक झाले असताना, महायुतीमधील भाजपकडून विधान परिषदेवर सदस्य असलेले रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टायमिंग साधलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणात बेजबाबदार वक्तव्य केलं असून, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येत मंत्री गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यादांचा राजीनामा द्यावा. हर्षल पाटील यांना मी श्रद्धांजली वाहतो, असे म्हटले आहे. तसेच प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावेत, असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

मंत्री गुलाबराव पाटलांनी पहिला माहिती घेऊन बोलायला हवे होते. आठ दिवसात मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) भेटून या सर्व प्रकाराबद्दल बोलणार आहे. सांगलीच्या तांदूळवाडी गावातील स्मशानभूमीमध्ये हर्षल पाटील यांच्या आज रक्षा विसर्जनवेळी सदाभाऊ खोत उपस्थित होते. याचवेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहे.

भाजपकडून 'NCP' अन् 'शिवसेना' टार्गेट?

महायुती सरकारच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा झाला आहे. आता माणिकराव कोकाटे अडचणीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाट, मंत्री योगेश कदम, मंत्री संजय राठोड, मंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, खासदार संदिपान भुमरे यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

काय म्हणाले होते मंत्री गुलाबराव पाटील...

'हर्षल पाटील यांच्या जल जीवन मिशनच्या कामाचे पैसे थकले होते, त्यामध्ये तथ्य नाही. मी स्वतः याविषयी जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आणि कार्यकारी अभियंत्याशी बोललो आहे. हर्षलला कोणतेही काम जिल्हा परिषदेकडून देण्यात आले नव्हते. तसेच त्यांचे कोणतेही बिल पेंडिंग नाही. जर त्यांना सबलेट काम घेतले असेल, तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही.'

आमच्या तोंडून वाईटही येऊ शकतं

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थकबाकीचा मुद्दा फेटाळला होता. कोणतेही बिल थकीत नसल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात हर्षल पाटील बिले मिळत नसल्याने संकटात सापडले होते. त्याला हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिल्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे तोंडघशी पडले. हर्षल पाटील यांच्या भावाने गुलाबराव पाटील यांना चांगलेच सुनावले. हर्षल पाटील यांनी सबकॉन्ट्रॅक्ट घेतलं म्हणजे तुमचं काम केलं आहे ना? त्याने तुमचं काम पूर्ण केलं आहे ना? त्याचं बिल सरकारच देणार ना? असे प्रश्न करत आमच्या तोंडून वाईटही येऊ शकतं. पण आम्ही आमच्यावर ओढावलेल्या दुःखाचे भाव ठेवून बोलत आहोत, असे म्हटले आहे.

अनेक कंत्राटदारांचे बिलं थकली

दरम्यान, अनेक कंत्राटदारांचे बिल थकल्याचं समोर आलं आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बिले मागण्यासाठी रांगा लावल्या आहेत. कंत्राटदारांची मोठी गर्दी नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात झाली होती. त्यामुळे मंत्री पाटील यांनी स्वतः केलेल्या दाव्यावरून अडचणीत सापडले आहेत. अशातच सदाभाऊ खोत मंत्री गुलाबराव पाटलांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT