Sangli News, 23 Oct : "सदाभाऊ खोत परिवर्तन महाशक्ती आघाडीत आले तरी त्यांना घेणार नाही, आमच्या आघाडीत स्वच्छ हात, स्वच्छ चारित्र्याची लोकं पाहिजेत मी जास्त काही बोलत नाही", असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.
शेट्टी (Raju Shetty) यांच्या याच टीकेला आता सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं आणि पायाखाली तुडवलं त्यामुळे मला काही उत्तर देण्याची गरज नाही, असा पलटवार त्यांनी केला.
सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले, "राजू शेट्टी यांना अहंकार आल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी चळवळीसाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे. राजू शेट्टींसारख्या दीड शहाण्याची मला काही गरज नाही. ते दररोज काशीला जाऊन अंघोळ करत आहेत, असा त्यांचा समज झाला आहे.
हातकणंगले लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं, पायाखाली घेऊन तुडवलं आणि त्यांचं डिपॉझिट जप्त केलं. हे जनतेने त्यांना दिलेलं उत्तर आहे. मला काही त्यांना उत्तर देण्याची गरज नाही."
दरम्यान, यावेळी सदाभाऊ यांनी जत विधानसभा मतदारसंघ गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "बहुजन समाजाचा तळागाळातील माणसाचा एक चेहरा म्हणून आज गोपीचंद पडळकरांकडे बघितलं जातं. परंतु काही प्रस्थापित घराणी त्यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत.
जत सारख्या दुष्काळी भागांमध्ये जीवाचं रान करून या माणसाने पिण्याच्या पाण्याची योजना आणली. तेथील तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी एमआयडीसी मंजूर सुद्धा केली. यामुळे हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी देशभर धावणारा दुष्काळी भागातील माझा तरुण स्थिर स्थावर होईल, अशा पद्धतीने ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभेचं तिकीटं दिलं पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.