Kolhapur Politics : ठाकरेंच्या शिवसेनेकडून के.पी पाटलांना उमेदवारी? राऊतांच्या 'त्या' घोषणेमुळे बंडखोर फुटीच्या मार्गावर

Radhanagari Assembly Constituency Election 2024 : संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता ए.वाय पाटील काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय निष्ठावंत शिवसैनिक फुटीच्या मार्गावर असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ आघाडीत कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.
Prakash Patil, A.Y Patil,  K.P Patil
Prakash Patil, A.Y Patil, K.P PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 23 Oct : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून (Radhanagari Assembly Constituency) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार के.पी पाटील (K.P Patil) यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून के.पी पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे जर शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाकडून के.पी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली तर आबिटकर विरुद्ध के.पी पाटील यांचा सामना रंगणार आहे. मात्र, गेल्या महिनाभरांपासून ए.वाय पाटील यांनी देखील आपल्याला ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल असा दावा केला होता.

तर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घोषणेनंतर आता ए.वाय पाटील काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवाय निष्ठावंत शिवसैनिक फुटीच्या मार्गावर असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राधानगरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.

Prakash Patil, A.Y Patil,  K.P Patil
Sunil Maharaj : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांची पक्षाला सोडचिठ्ठी

जागावाटपातील वादानंतर हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सुटला. मात्र, उमेदवार कोण असावा याची चाचपणी सुरू होती. महायुतीतून माजी आमदार के.पी पाटील, राहुल देसाई यांनी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) उमेदवारीची मागणी केली होती. शिवाय जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय पाटील यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती. दोघांनीही आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा केला होता.

दोन दिवस जागावाटपाच्या वादामुळे आता अखेर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाला आहे. त्यानुसार राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे जाणार असून माजी आमदार के. पी पाटील या ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Prakash Patil, A.Y Patil,  K.P Patil
Mahim Assembly Election : मनसेकडून अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

गेल्या दोन दिवसांपासून के.पी पाटील हे मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के.पी पाटील यांना उमेदवारीचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून के.पी पाटील यांची लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राधानगरी (Radhanagari) विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. के.पी पाटील यांच्या उमेदवारीनंतर निष्ठावंत ठाकरे गट कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण, गेले दहा वर्ष निष्ठावंत शिवसैनिक हा माजी आमदार के.पी पाटील यांच्या विरोधात होता.

शिवाय शिवसेनेची साथ सोडलेले आबिटकर यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिक एकवटला आहे. अशावेळी निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांची होती. मात्र, त्यांना डावललं जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील इच्छुक होते. मात्र ते आता कोणती भूमिका घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे ए.वाय पाटील यांच्या बंडखोरीचेही संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com