Samadhan Avtade
Samadhan Avtade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार होत असताना आमदार आवताडे ढोलवादनात मग्न!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : एकीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना इकडे मंगळवेढ्यात (Mangalveda) आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गंत काढलेल्या जनजागृती रॅलीत ढोल वाजवत सहभाग घेतला. (MLA Samadhan Avtade News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; हर घर झेंडा’ हा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील ६० हजार घरांवर झेंडा लावण्यासाठी आज (ता. ९ ऑगस्ट) प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. त्यामध्ये आमदार आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारकही सहभागी झाले होते.

स्वातंत्राच्या अमृतमहोत्सानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात. देशासाठी बलिदान दिले, त्या अज्ञात, नायक, क्रांतीकारक यांचे स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, तसेच देशभक्तीची जाज्वल भावना जनमाणसांत राहावी, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान राबबिले जाणार आहे, त्यासाठी शहरातून ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजासह मान्यवर व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत रॅली काढली. रॅलीत ढोलपथक, झांज पथक, एनसीसी पथक, पतंजली योग समिती, वारी परिवार यांच्यासह शहरातील विविध शाळांतील ३५०० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. रॅलीत आमदार आवताडे हे ढोलपथकात सहभागी होत ढोल वाजवला.

या रॅलीत उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार स्वप्नील रावडे, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे, अजित जगताप, शशिकांत चव्हाण, औदुंबर वाडदेकर आदीही सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT