<div class="paragraphs"><p>MLA Sangram Jagtap gave a statement to Minister Uday Samant for non-teaching staff of the college. With MLA Nitin Pawar</p></div>

MLA Sangram Jagtap gave a statement to Minister Uday Samant for non-teaching staff of the college. With MLA Nitin Pawar

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संग्राम जगताप यांचा पाठपुरावा

Amit Awari

अहमदनगर : राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचारी आपापल्या महाविद्यालयांसमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली. यावेळी आमदार नितीन पवारही उपस्थित होते. MLA Sangram Jagtap's pursuit for non-teaching staff in the college

मंत्री सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रलंबित महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समिती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 28 डिसेंबर 2010 व 15 डिसेंबर 2011च्या शासन निर्णयानुसार लागू असलेली 12 व 14 वर्षांची सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाची परवानगी नाही. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने7 डिसेंबर 2018 ला व 16 फेब्रुवारी 2019 या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेली आहे. या दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात यावेत व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वक लागू करून मिळावी.

सेवानिवृत्त व प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सेवानिवृत्त वेतनापासून व सातव्या वेतन आयोगाच्या वेतनापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊन 7 डिसेंबर 2018 व 16 फेब्रुवारी 2019 च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन निर्णय लवकरात लवकर रद्द करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाची मान्यता घेऊन लागू करण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगर येथील न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय व अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारासमोर शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलन करत आहेत. या धरणे आंदोलनाला आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी नुकतीच भेट दिली होती. या वेळी आमदार जगताप यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेऊन या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे तसेच या मागण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल ( सोमवारी ) आमदार संग्राम जगताप यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.

महापालिकेसाठी मागितला यशोमती ठाकुरांकडे निधी

अहमदनगर महापालिका महिला बालकल्याण समितीच्या वतीने 16 डिसेंबर रोजी बैठक घेऊन शहरातील शाळा व अंगणवाडी करता अतिरिक्त पोषण आहार सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तरी शासनाने लवकरात-लवकर निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून सर्वसामान्य मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या पोषक आहाराच्या माध्यमातून आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल,यासाठी शासनाने लवकरात-लवकर या प्रस्तावाचा विचार करून मान्यता द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे काल (सोमवारी) मुंबई येथे आमदार संग्राम जगताप यांनी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT