अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलिनीकरण करून घेण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. Sangram Jagtap's Anil Parbana Sakade for ST employees
अहमदनगर शहरातील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या आंदोलनात जाऊन आमदार संग्राम जगताप कर्मचाऱ्यांना भेटले. या आंदोलनाला समर्थन असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले होते. त्यानुसार आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत जाऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली.
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आज ( ता. 16 ) अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगार संपाच्या बाबत सहानुतीबाबत विचार करण्यात यावा असे निवेदन दिले. तसेच अहमदनगर शहरातील तीनही बसस्थानक बीओटी तत्वावर आधुनिक पध्दतीने विकसित करुन कार्यरत करण्याबाबत चर्चा करुन निवेदन दिले. यात शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक चौक बसस्थानकांचा समावेश आहे. तसेच लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी मंत्री अनिल परब यांनी ग्वाही दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.