कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला संख्याबळ मिळाले असले तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 81 पैकी 34 जागांवर विजय मिळवला.
एकाकी लढत देत काँग्रेसने कोल्हापुरात आपली राजकीय ताकद आणि नैतिक विजय सिद्ध केला.
Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीने सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी पक्षीय पातळीवर काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या सर्वच विरोधातील नेत्यांना घायकुतीला आणले. 81 पैकी तब्बल 34 जागांवर विजय मिळवत कोल्हापूर शहरातील व्यक्तिगत ताकद काँग्रेसने दाखवली आहे. एका बाजूला महायुतीमधील सर्वच दिग्गज नेते तर दुसरीकडे काँग्रेसकडे एकमेव सतेज पाटील यांनी खिंड लढवली. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेसचाच नैतिक विजय झाल्याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच महायुतीने एकीची मोठ बांधली. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्रित येत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून केवळ काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत महायुती विरोधात फाईट दिली. महायुती समोर केवळ सतेज पाटील यांचे तगडे आव्हान उभे होते. तर दुसरीकडे कुमकवत झालेली ठाकरे सेना जागा वाटपामध्ये आणखीन दुबळी झाली.
जागा वाटपामध्ये इतर पक्षांना अधिक स्थान न देता काँग्रेसकडून अधिक उमेदवार कसे देतील याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील यांनी केला. त्यामुळे काँग्रेस 75 जागांवर तर ठाकरे सेना केवळ पाच जागांवर निवडणूक लढवली. मात्र जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि तिसरी आघाडी स्थापन केली.
सतेज पाटीलच टार्गेट...
महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून निवडणुकीच्या कालावधीत विकास कामांपेक्षा केवळ सतेज पाटील यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. थेट पाईपलाईन आणि रस्त्याचे प्रश्न घेऊन आमदार पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले. महायुतीचे नेते भाजपचे खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून चौफेर टीका झाली. मात्र तरी देखील काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे महायुतीला पुरून उरले.
हाथ चिन्हाचा झाला फायदा
जागा वाटपामध्ये काँग्रेसने अधिक जागा घेतल्या. 75 ठिकाणाहून काँग्रेस लढत असताना प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर केवळ हाताचे चिन्ह राहिले. त्यामुळे प्रचार करताना काँग्रेसला केवळ हाताचाच प्रचार करावा लागला. तर त्याच्या विरोधात महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रचार करावा लागल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला.
...आणि अजिंक्यतारा
उमेदवार निवडण्यापासून ते त्याच्या मतमोजणी पर्यंत सर्व जबाबदारी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या कार्यालयातून अजिंक्यतारा येथून करण्यात आली. सुरुवातीपासूनच अजिंक्यतारा कार्यालयातून प्रत्येक उमेदवाराच्या रोजच्या सभा, बैठकाचे नियोजन सुरू होते. एकमुखी निर्णय होत असल्याने त्याचा फायदा देखील काँग्रेसला झाला.
सभांचा नो इम्पॅक्ट...
महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात आले होते. मात्र केवळ सभांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मर्यादितच मतदार संघासाठी प्रचार सभा घेतली. तर कावळा नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रोडशो देखील फ्लॉप ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापुरात प्रचारासाठी आले.
मात्र खासदारांच्या चिरंजीव कृष्णराज महाडिक यांचे प्रमोटिंग झाल्याची चर्चा यनिमित्ताने उमटली. त्या ऐवजी मोठी सभा मुख्यमंत्री यांची झाली असती तर त्याचा आणखीन फायदा भाजपला झाला असता. स्थानिक आणि अनुभवी चेहऱ्याला काँग्रेसकडून संधी देण्यात आली. इतकेच नव्हे तर नवे चेहरे मात्र आपापल्या मतदारसंघात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उमेदवारांनाच काँग्रेसने संधी दिल्याने त्याचा देखील मोठा प्रभाव या निकालात झालेला दिसतो.
पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी एकूण 36
काँग्रेस 35
शिवसेना उबाठा 01
महायुती एकूण 44
भाजप 26
शिवसेना 15
राष्ट्रवादी काँग्रेस 4
जनसुराज्य शक्ती 1
1. कोल्हापूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष कोणता ठरला?
काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी 34 जागा जिंकल्या आहेत.
2. महायुतीला जास्त नगरसेवक असूनही काँग्रेसचा विजय का मानला जातो?
काँग्रेसने एकाकी लढत देत मोठ्या संख्येने जागा जिंकल्याने तो नैतिक विजय मानला जातो.
3. या विजयामागे कोणते नेतृत्व महत्त्वाचे ठरले?
काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.
4. या निकालाचा कोल्हापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
काँग्रेसचे वजन वाढणार असून महायुतीला नव्याने रणनीती आखावी लागेल.
5. हा निकाल काँग्रेससाठी पुढील निवडणुकांत फायदेशीर ठरेल का?
होय, या निकालामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांत आत्मविश्वास मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.