Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही थेट महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होत आहे. लोकसभा, विधानसभा, निवडणूक सर्वाधिक चर्चा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या होमपीच असणाऱ्या कसबा बावड्याची सर्वाधिक चर्चा होत असते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधील ही लढत त्याच पद्धतीने चुरशीची बनली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या प्रभागात भाजपने एक पाऊल मागे घेऊन चारीही जागांवर शिवसेनेचे उमेदवार दिलेत. त्यामुळे भाजपचे(BJP) कमळ पहिल्याच प्रभागात फुललेले नाही. उलट महायुतीने इथे वेगळीच चाल खेळून प्रभागात एक चिन्हच देण्यात यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने देखील चार उमेदवारांना मागे दोन अनुभवी आणि दोन नवखे खेळाडू रिंगणात उतरवले आहेत.
कोल्हापूर लोकसभा पाटोपाठ विधानसभा निवडणुकीत कसबा बावडा परिसरातील मतदारांनी नेहमीच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची साथ दिली आहे. शिवसेना आणि भाजपकडून या प्रभागात अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, स्वतः सतेज पाटील यांचे हे होम ग्राउंड असल्याने विरोधकांना भगवा चौकामध्येच अडवण्यात यश आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून चांगली मोर्चेबांधणी या प्रभागात केली आहे. त्याच अनुषंगाने या महापालिका निवडणुकीत भाजपने एक ही उमेदवार न देता शिवसेनेकडून चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर काँग्रेसकडून विरोधात चार उमेदवार उमेदवार रिंगणात आहेत.
काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी चार जागांसाठी तब्बल 40 जण इच्छुक होते. मात्र, प्रत्यक्ष उमेदवार निवडत असताना दोन अनुभवी चेहरे आणि दोन नव्या चेहऱ्यांना पसंती दिली आहे. काँग्रेसकडून अनुसूचित जाती या प्रवर्गातून सुभाष बुचडे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून पुष्पा वरुटे, सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून रूपाली अजित पोवार आणि सर्वसाधारण या प्रवर्गातून हरीश चौगुले यांना उमेदवारी दिली आहे.
यामधील बुचडे आणि पोवार यांचा राजकीय अनुभव तगडा आहे. बुचडे यांच्या घरी महापौर तर पवार यांच्या घरी स्थायी समिती सभापतीचे पद होते. दरम्यान या चार उमेदवारांसाठी 40 जण इच्छुक असल्याने बंडखोरांची संख्या वाढेल अशी शक्यता होती. मात्र आमदार सतेज पाटील यांनी डॅमेज कंट्रोल वेळीच केली आहे. मात्र माझी स्थायी समिती सभापती संदीप निर्धार यांना उमेदवारी न मिळाल्याने ते अद्यापही नाराज आहेत.
तर दुसरीकडे शिवसेनेने आपले तगडे उमेदवार या मतदारसंघातून दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिल्याने शिवसेनेमध्ये उत्साह आहे. अनुसूचित जातीमधून अमर साठे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून गीता जाधव, सर्वसाधारण महिलांमधून प्रियांका उलपे, तर सर्वसाधारण मधून कृष्णात लोंढे हे उमेदवार रिंगणात आहेत. तर अन्य दोन अपक्ष उमेदवार अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला मधून रिंगणात आहेत.
वास्तविक पाहता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्थानिक मतदारांचा अंदाज घेता या मतदारसंघातून विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर बदललेली समीकरण , भाजप न दिलेला उमेदवार, सहअंतर्गत घडामोडींना चांगलाच वेग धरला आहे.
महाडिक म्हणून भाजपला होत असलेला विरोध लक्षात घेता शिवसेनेने खबरदारी घेऊन चारी उमेदवार धनुष्यबाणावर दिले आहेत. त्यामुळे प्रभागात काँग्रेस विरुद्ध धनुष्यबाण ही लढत सतेज पाटलांसाठी अस्तित्वाची, प्रतिष्ठेची ठरत आहे. तर शिवसेनेसाठी आपला किल्ला भक्कम करण्यासाठी पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.