Shahaji Patil-Nana Patole  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu On Nana Patole: काँग्रेसने कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष नेमलाय : शहाजीबापूंचा नाना पटोलेंवर पलटवार

Shahajibapu News: सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटी अनेक जण त्यांना विरोध करताना दिसत आहेत.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगोला येथे रविवारी (ता. ७ मे) झालेल्या कार्यक्रमात ‘काय झाडी काय डोंगरवाले, आपण गद्दार नाही’ अशी टीका आमदार शहाजी पाटील यांच्यावर केली होती. त्याला आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज सांगोल्यातील एका कार्यक्रमानंतर उत्तर दिले. ‘काँग्रेस पक्षाने ज्याला काहीच कळत नाही, असा कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष केला,’ अशी बोचरी टीका पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर केली. (MLA Shahaji Patil's reply to Nana Patole's criticism)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगोला येथे बाबुराव गायकवाड यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या वेळी पवार यांच्या बरोबरच आमदार शहाजीबापू पाटीलही (Shahaji Patil) उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या टिकेला शहाजीबापूंनी उत्तर दिले.

शहाजीबापू म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटी अनेक जण त्यांना विरोध करताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाने तर राजकारणात ज्याला काहीच कळत नाही, असा कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष निवडला आहे. हे प्रदेशाध्यक्ष दररोज काहीही बोलत सुटले आहेत.

सध्या न्यायप्रविष्ठ असलेला राजकीय निकाल शंभर टक्के आमच्याच बाजूने लागेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना आमदार शहाजीबापू म्हणाले की, संजय राऊत दररोज सकाळी दोन दिवसात राजकारणात मोठा स्फोट होईल, असे बोलत आहेत. गेली चार महिने झाले, कोणताही स्फोट झाला नसून आमचे शिंदे-फडणवीस सरकार सुरळीत सुरू आहे. विरोधकांना आता टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाना पटोले काय म्हणाले होते

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोला तालुका सर्वत्र ओळखला जात होता. सध्या मात्र वेगळ्या कारणांनी सांगोला तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे, असे सांगून आम्ही मात्र झाडी, डोंगारवाले गद्दार नाही, तर राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी बांधील असणारे महाविकास आघाडीचे खुद्दार आहोत, असा टोला नाना पटोले यांनी नाव न घेता आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT