Shivajirao Patil Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics : 'गोकुळ'च्या आडून हसन मुश्रीफ टार्गेट? ईडीमार्फत चौकशीची मागणी, भाजप आमदाराच्या आरोपाने खळबळ

Gokul Shivajirao Patil Hasan Mushrif : गोकुळच्या गैरव्यवहाराची तसेच नवीन 3700 दूध संस्थांच्या नोंदणीच्या चौकशीची मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे.

Roshan More

Gokul News : गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका बड्या मंत्रांच्या आशीर्वादाने गोकुळ मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

पाटील यांनी आरोप केलेला मोठा मंत्री कोण? अशी चर्चा आहे. गोकुळ गैरव्यवहाराच्या आरोपातून मंत्री हसन मुश्रीफ यांना आमदार पाटील टार्गेत तर करत नाहीत ना, असे देखील बोलले जात आहे.

तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिली या मंजुरीची आणि इतर गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणी केवळ एका मंत्र्याच्या सांगण्यावरून केली. अधिवेशनात हे मुद्दे मी मांडणार आहे. वेळप्रसंगी ईडीमार्फत चौकशी व्हावी म्हणून मी उपोषणाला देखील बसेल, असा इशारा देखील पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार?

पाटील यांनी सांगितले की, गोकुळवर तातडीने प्रशासक नेमण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सगळ्यात मोठी पवित्र संस्था टिकावी यासाठी न्याय मिळावा. त्यांच्या संस्था घराणेशाहीच्या ताब्यात जाऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT