Gokul Election : गोकुळचं टोकन येणार अंगलट, सभासदत्व रद्द झाल्यास वसुलीची धास्ती? निवडणुकीपूर्वीच केला होता पैशांचा चुराडा

Gokul Membership Cancellation Crisis : गोकुळ दूध संघातील वाढीव सभासदाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत गेल्याने बाराशे सभासद रडारवर होते. तत्कालीन अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे वाढीव सभासदांबाबत तक्रार झाल्यानंतर हे बाराशे सभासद त्यांनी रद्द केले होते.
  gokul milk union Election 2026
gokul milk union Election 2026 Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 28 Mar : गोकुळ दूध संघातील बाराशे सभासद या निवडणुकीत पात्र राहतील की अपात्र राहतील याबाबत अनेक संचालकांना शंका आहे. मात्र निवडणुकीच्या तीन ते चार महिने आधीच जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी आणि संचालकांनी सभासदांना लाखमोलाच टोकन हातावर टेकवले होते.

ठराव गोळा करण्याच्या वेळी सभासद आपल्या बाजूने राहावा यासाठी नेत्यांनी विशेष काळजी घेत लक्ष्मी दर्शन घडवून आणले होते. न्यायालयाच्या निकालानंतर सभासदांच्या पात्रतेबाबत दुग्ध निबंधक प्रशासन निर्णय घेणार असल्याने या सभासदांवर कारवाईची टांगती तलवार आहे. टोकन घेतलेल्या सभासदांचा यामध्ये सहभाग असल्याने सभासद रद्द झाल्यास नेत्यांकडून आता वसूली होण्याची धास्ती घेतली आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक ही ठरावावर अवलंबून असते. ज्याच्याकडे अधिक ठराव त्याला उमेदवारी आणि विजयापर्यंत जाण्याचं समीकरण ठरलेलं असतं. जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय केंद्र असल्याने गोकुळ दूध संघावर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच मागील पंचवीस वर्षाची महाडिक गटाची सत्ता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी खालसा केल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे.

  gokul milk union Election 2026
Ashok Kharat Video : अशोक खरातचे व्हिडिओ बाहेर कसे आले? "ऑफिस बाॅयच्या बायकोचा..."; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मोठा खुलासा

सध्या जिल्ह्यातील राजकीय समीकरण वेगळी असल्याने प्रत्येक ठराव हा आपल्याकडेच येण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आणि संचालकांनी संस्था सभासदांना लाख मोलाचं टोकन दिले आहे. राधानगरी, भुदरगड, कागल, चंदगडमधील सभासदांना पहिल्या टप्प्यात जवळपास 4000 सभासदांना टोकन दिले आहे. उर्वरित टोकन हे निवडणुकीत देण्याचे आश्वासन हे काही संचालक आणि नेत्यांकडून देण्यात आले होते.

मात्र गोकुळ दूध संघातील वाढीव सभासदाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत गेल्याने बाराशे सभासद रडारवर होते. तत्कालीन अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे वाढीव सभासदांबाबत तक्रार झाल्यानंतर हे बाराशे सभासद त्यांनी रद्द केले होते. मात्र मुंडे यांचा आदेश रद्द करण्यासंदर्भात तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली होती.

  gokul milk union Election 2026
Rupali Chakankar Controversy : "चाकणकरांचा 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला!" : एकाच वाक्यात रोहिणी खडसेंकडून 'जुन्या' वादाचा हिशोब सेटल

न्यायालयाच्या निकालात विखे पाटील यांचे आदेश रद्द झाल्याने बाराशे सभासदांच्या अपात्रतेबाबत दुग्ध निबंधक याबाबत निर्णय घेणार आहेत. सोमवारपासून त्याची पडताळणी होणार असल्याने यामध्ये अनेक संस्था सभासद रद्द होणार आहेत. मात्र निवडणुकीपूर्वीच काही सभासदांनी नेते आणि संचालकांकडून टोकन घेतल्याने त्याच्या वसुलीची धास्ती लागून राहिली आहे.

त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण प्रशासक येण्याऐवजी गोकुळ दूध संघाची निवडणूक व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी अनेक जण पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहेत. दूध संघाची निवडणूक ही मुदतीत व्हावी अशी मागणी आहे. त्यामुळे सभासद रद्द झाल्यास चालून आलेली लक्ष्मी ही पुन्हा माघारी घालवावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com