Uttam Jankar-Shahjibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar : ‘ते आपल्याला नागडं करतंय अन्‌ फोटो दुसऱ्याला पाठवतंय’: उत्तम जानकरांचा नाव न घेता गोरेंवर हल्ला

Sangola Nagar Palika Election 2025 : उत्तम जानकर यांनी भाजपवर सहकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. सांगोला आणि महाराष्ट्रातील भाजपमधील अंतर्गत तणाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

सरकारनामा ब्यूरो

आमदार उत्तम जानकर यांनी भाजपवर कठोर टीका करत मदत करणाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
त्यांनी २०१९ पासून झालेल्या राजकीय वर्तनाचा उल्लेख करून स्वतःलाही वारंवार "नागडे" केल्याचे सांगितले.
सांगोला नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या राजकारणाविरोधात मोठा जनतेचा रोष असून यावेळी जनता मतदानातून उत्तर देईल, असे त्यांनी आवाहन केले.

Sangola, 24 November : ज्यांनी ज्यांनी भाजपला मदत केली, त्या सर्वांना भाजपने नागडं केलं आहे. आधी मला केलं, त्यानंतर शहाजीबापू पाटील आणि आता डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाही त्यांनी नागडं केलंय. आता ते एवढ्यावर गप्प बसत नाहीत, आपल्याला नागडं करतंय आणि फोटो दुसऱ्याला पाठवतंय, अशा शब्दांत आमदार उत्तम जानकर यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरेंवर हल्लाबोल केला.

आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, मी मागच्या वेळी प्रचाराला आलो होतो, पण ते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आला होतो. ज्यांनी तब्बल 55 वर्षे निष्ठा, तत्व सांभाळलं. ते 55 दिवसांत घालवल्याचा मलाही राग आला. शहाजीबापू तुम्ही सांगितलं म्हणून 2019 मध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार मी केला आणि माळशिरस तालुक्यातून एक लाखाचं मताधिक्क्य दिलं. त्याही वेळी माझी फसवणूक करण्यात आली.

शहाजीबापू (ShahajiBapu), जयाभाऊ हे पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या एवढा आनंद कोणालाच झालेला नव्हता. पण मला तर नागडं केलंच केलं. मला 2019 मध्ये फसवलं. गेल्या निवडणुकीत मी विमानातून कशीतरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचलो. शहाजीबापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम केला, असेही जानकर यांनी नमूद केले.

उत्तम जानकर म्हणाले, सांगोला नगराध्यक्षपदाची निवडणूक ही वेगळी आणि ऐतिहासिक आहे. तुम्हा सगळ्यांना गिळकृंत केलेले आहे. तुमचं अस्तित्व नामशेष केलेले आहे. ज्या शहाजीबापूंनी त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांच्याशीही भाजपच्या लोकांनी गद्दारी केलेली आहे. अशा पद्धतीचं भयानक चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यांच्या विरोधात मी एकटाचा फाईट देत होतो, त्यांना सडकून काढत होतो. आता माझ्या जोडीला शहाजीबापू आले आहेत.

ज्या कोणी सूर्याजी पिसाळाने सांगोला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची रचना केली आहे. ती कोणालाही आवडलेली नाही. सांगोला तालुक्यातील एकाही नागरिकाला ती आवडलेली नाही. भरउन्हात बसलेल्या या गर्दीच्या मनात आग आहे. ती आग तुम्हाला दोन तारखेच्या मतदानातून दाखवायची आहे, असे आवाहन जानकर यांनी केले.

ते म्हणाले, मी आणि शहाजीबापू 35 वर्षे एकमेकांचे चांगले मित्र होतो. पण, सत्तेच्या काळात किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून मागील काळात डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभं राहिलो. पण, यापुढच्या काळात शहाजीबापूंसोबत मी ठामपणे आहे, हे सांगण्यासाठी मी सांगोल्यात आलो आहे.

प्र.1: उत्तम जानकर यांनी कोणावर आरोप केले?
उ: त्यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे व भाजपवर कठोर टीका केली.

प्र.2: त्यांनी स्वतःशी संबंधित कोणती नाराजी व्यक्त केली?
उ: २०१९ आणि त्यानंतर वारंवार फसवणूक व अपमान झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्र.3: सांगोला नगराध्यक्ष निवडणुकीबाबत जानकर काय म्हणाले?
उ: भाजपने केलेली रचना कोणालाच न आवडल्याने जनतेत तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी म्हटले.

प्र.4: जानकर आता कोणासोबत उभे आहेत?
उ: ते शहाजीबापूंसोबत ठामपणे असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT