Pravin Darekar : उत्तम जानकर हे भरकटलेले...अपरिपक्व; ईव्हीएमच्या नावाने रडीचा डाव खेळताहेत : भाजप नेत्याचे सडेतोड उत्तर

Uttam Jankar's Allegations : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला जे यश मिळाले आहे, तसेच यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळेल, यामुळे ते भयभयीत झाले आहेत. त्यातून एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न उत्तम जानकर यांच्या माध्यमातून केला जात आहे.
Uttam Jankar-Pravin Darekar
Uttam Jankar-Pravin Darekar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 29 December : आमदार उत्तम जानकर हे भरटकलेले दिसत असून त्यांचं बोलणं हे अपरिपक्व आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव महाविकास आघाडीच्या इतका जिव्हारी लागला आहे की, त्यातून आघाडी अजूनही बाहेर पडलेली नाही. इकडची मतं तिकडं आणि तिकडची मतं इकडं आली, असं सांगणारा ते अभ्यासू नेता किंवा व्यक्ती असतील तर देशाने त्यांचा उपयोग एक शास्त्रज्ञ म्हणून करून घ्यायला हवा, असा टोला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांना लगावला.

उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आज सकाळी बारामतीत बोलताना महायुती सरकरने दीडशे मतदारसंघात फेरफार केल्याचा आरोप केला होता. उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १२, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १८, तर भाजपचे ७७ आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षांची संख्या केवळ १०७ एवढी आहे, त्यांच्यासोबत दोन ते तीन अपक्ष आहेत, त्यामुळे महायुतीकडे केवळ ११० आमदार आहेत, असा दावा उत्तम जानकर यांनी केला होता. त्याला दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, आमदार उत्तम जानकर यांचं बोलणं हे अपरिपक्व आहे. लोकशाहीमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून अनेक निवडणुका झाल्या, त्यामध्ये काँग्रेस पक्ष जिंकलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे पराभव इतका जिव्हारी लागला आहे की, त्यातून महाविकास आघाडी अजूनही बाहेर पडलेली नाही. त्यांचं दुःख आणि विफलता उत्तम जानकर यांच्या माध्यमातून बाहेर येताना दिसत आहे. उत्तम जानकर आणि महाविकास आघाडी ही ईव्हीएमच्या नावाने रडीचा डाव खेळत आहे.

Uttam Jankar-Pravin Darekar
Andhare On Prajakta Mali : सुषमा अंधारेंची प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवरच शंका; ‘बीडमधील मोर्चाला काउंटर करण्यासाठी...’

कुठलं अंकशास्त्र आणलं. कुठल्या आधारावर ते बोलत आहेत, हे उत्तम जानकर यांनी एकदा स्पष्ट करावं. अशी कुठली मशिनरी आहे की, ज्या ईव्हीएमध्ये ते घुसले आहेत. इकडची मतं तिकडं गेली आणि तिकडचं मतं इकडं आली, हे ते सांगत आहेत. अशा प्रकारचा अभ्यासू नेता किंवा व्यक्ती असेल तर एक शास्त्रज्ञ म्हणून देशाने त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा, अशी खिल्लीही दरेकर यांनी जानकरांची उडवली.

ते म्हणाले, उत्तम जानकर हे एकाच वेळी दोन भूमिका ते मांडत आहेत. प्रश्नही त्यांचा आणि उत्तरही त्यांचंच. ईव्हीएमध्ये गडबड आहे, हे सांगताना तांत्रिक बाब स्पष्ट करता येत नाही. एखादी गोष्ट सांगता येत नाही, त्याचे तुम्हाला पुरावे देता येत नाहीत. तर निराधार आणि बिनबुडाचे कशासाठी बोलता. तुम्ही असं कितीही बोललात तर राज्यातील जनतेचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही.

Uttam Jankar-Pravin Darekar
Suresh Dhas Vs Pankaja Munde : पंकजा मुंडेंसोबतच्या भांडणाची सुरेश धसांनी प्रथमच दिली जाहीर कबुली; ‘होय आमच्यात भांडण...’

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला जे यश मिळाले आहे, तसेच यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळेल, यामुळे ते भयभयीत झाले आहेत. त्यातून एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न उत्तम जानकर यांच्या माध्यमातून केला जात आहे. पण राज्यातील जनतेला सर्वकाही नीट माहिती आहे. अशा प्रकारच्या गणितीला जनता भीक घालणार नाही आणि भूलणारही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com