Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangle Elections winner : आवडे, कोरेंनी शब्द पाळला; धैर्यशील मानेंचा विजय खेचून आणला

Rahul Gadkar

Hatkanangle Lok Sabha Election 2024 Result : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. निकालाच्या एकूण 24 फेऱ्यापर्यंत कोण जिंकणार याचा थांगपत्ता न लागल्याने कार्यकर्त्यामध्ये प्रचंड धाकधूक वाढली होते. मात्र जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या शर्तीच्या प्रयत्नामुळे अगदी शेवटच्या क्षणी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरुवातीपासून प्रचंड चुरस निर्माण झाली होती. शिवाय एक्झिट पोलमध्ये देखील या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर विजय होतील, असा अंदाज देण्यात आला होता. मात्र एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरवत अगदी शेवटच्या क्षणी खासदार धैर्यशील माने दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 24 व्या फेरी अखेर धैर्यशील माने यांनी 14 हजार 723 इतके मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

उमेदवारीवरून हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळाली. माहितीमध्ये उमेदवार कोण, असावा यावरून शेवटच्या क्षणापर्यंत चुरस होती. मात्र खासदार धैर्यशील माने यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवून मुख्यमंत्री शिंदे यांनी माने यांना उमेदवारी दिली. केवळ उमेदवारी दिली नाही तर खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार विनय कोरे यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. याचाच फायदा खासदार धैर्यशील माने यांना झालेला दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना जवळपास 45 हजार पेक्षा जास्त मताधिक्य देण्यात महायुतीच्या नेत्यांना यश मिळाले आहे. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तर आमदार विनय कोरे यांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना रोखण्याचे काम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT