Exit Polls Result 2024 : राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात ( Sangli Lok Sabha Constituency ) 'एक्झिट पोल'नुसार धक्कादायक माहिती समोर येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसलाच बंडखोरी फायद्याची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सांगलीत तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत झाली. काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील ( Vishal Patil ) यांना विजयाचा गुलाल लागण्याचा अंदाज 'एक्झिट पोल'नुसार व्यक्त केला जात आहे. 'पोल स्टार्ट पीपल इनसाइट्स' या एक्झिट पोलनुसार सांगली लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.
सांगली लोकसभा निवडणूक यंदा राज्यात चर्चेचा विषय ठरला महायुतीकडून संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. तर 'इंडिया' आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाटणीला गेल्याने त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून तयारी करत असलेले काँग्रेसचे प्रदेशाउपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत 'इंडिया' आघाडीच्या विरोधातच शड्डू ठोकला.
सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी झाल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांना मत विभाजनाचा फायदा होईल, असं प्राथमिक टप्प्यात दिसून येत होते. पण, भाजप आणि संजयकाका पाटील यांच्याबाबत असणारी मतदारसंघात नाराजी, पक्षांतर्गत असणारी नाराजी, पक्षांतर्गत असणारे गुपित शत्रू यांनी शेवटच्या टप्प्यात स्वीकारलेली भूमिका ही भाजपला तोट्याची ठरल्याचं दिसत आहे.
शिवाय अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत असणारी सहानुभूती, 'इंडिया' आघाडीतील काँग्रेसचे आमदार आणि शेवटच्या टप्प्यात घेतलेली भूमिका ही विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.