Narendra Modi, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Congress News : 'इंडिया'कडून पराभवाची मोदींना भीती; म्हणून देशाचे नाव बदलायला निघालेत : पृथ्वीराज चव्हाण

Umesh Bambare-Patil

Karad Congress News : नरेंद्र मोदी सत्तेत येण्याआधी देशातील जनतेने विरोधी पक्षांनाही साथ दिली होती. पण, त्या निवडणुकीत मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजपचा फायदा झाला. हेच मतांचे विभाजन टाळले तर एकास एक निवडणूक होईल, हे लक्षात घेऊन काँग्रेससह २८ पक्षांची आघाडी झाली आहे. आमची इंडिया आघाडी आल्याने या आघाडीकडून पराभव होईल, याची मोठी भीती मोदींना आहे. म्हणून ते देशाचे नाव बदलण्यासाठी निघाले आहेत. लढाई नाव, झेंडे किंवा चिन्हाबरोबर. ही लढाई विचारांची आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेस Satara Congress व कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीने आयोजित केलेली जनसंवाद पदयात्रा कार्वे नाका येथील ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव स्मृतिस्तंभास अभिवादन करून सुरू झाली. जनसंवाद पदयात्रा कार्वे, कोडोली, दुशेरे येथून शेरे येथे आल्यानंतर काल रात्री तेथील जाहीर सभेत पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने माणूस म्हणून प्रत्येकाला समान वागणूक दिली. गुलामगिरीतून हा देश बाहेर काढून महासत्ता करण्याची शक्ती देशाच्या घटनेत आहे. हेच संविधान नसते तर ब्रिटिश गेले असते आणि वर्ण व्यवस्था कायम राहिली असती.

समता, मानवता तोडण्याचा या मूठभर लोकांचा डाव आहे. त्यांचा मोदी हा चेहरा पुढे असला, तरी त्यांचा बोलवता धनी आरएसएस आहे. त्यांच्या मागे आपली माणसे धावत आहेत. यशवंतराव मोहिते भाऊंच्या विचारधारेला जी मंडळी सोडून गेली, याचे दुर्दैव वाटते.

अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, कऱ्हाड दक्षिण जिल्ह्यात प्रगल्भ तालुका आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून स्वातंत्र्य दिलेल्या विचाराला जनतेने साथ दिली आहे. विलासकाकांनी प्रतिगामी विचारांविरोधात लढा दिला. ही विचारसरणी पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून आजही आपण चालवत आहोत. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रयत कारखाना प्रयत्नशील आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT