Atul Bhosale, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad BJP News : जनसामान्यांचे पंतप्रधान अशी मोदींची जगभरात ओळख; त्यांनीच देशाची प्रगती केली...अतुल भोसले

Atul Bhosale कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपच्या मेरी माटी, मेरा देश अभियानाच्या निमित्ताने झालेल्या संवाद मेळाव्यात अतुल भोसले बोलत होते.

Umesh Bambare-Patil

Karad BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वार्थाने देशाची प्रगती केली आहे. त्यामुळे जनसामान्यांचे पंतप्रधान अशी त्यांची जगभरात ओळख झाली आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी व्यक्त केले आहे.

कऱ्हाड दक्षिणमध्ये Karad South भाजपच्या मेरी माटी, मेरा देश अभियानाच्या निमित्ताने झालेल्या संवाद मेळाव्यात अतुल भोसले Atul Bhosale बोलत होते. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम अध्यक्षस्थानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात मेरी माटी, मेरा देश अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड दक्षिणमध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

दुशेरे येथील हुतात्मा स्मारकात भोसले व जिल्हाध्यक्ष कदम यांच्या हस्ते यात्रेस प्रारंभ झाला. अतुल भोसले म्हणाले, आपल्या भूमीतील अनेक शूरवीरांनी ब्रिटिशांच्या विरोधात छातीठोकपणे उभे राहत त्यांना सळो की पळो करून सोडले. या शूरवीरांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून, मोदीजींनी महिला आरक्षण, ३७० कलम हटविणे, उज्वला गॅस योजना, एन.आर.सी., संरक्षण व्यवस्थेचे मजबुतीकरण असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, कुठल्याही सरकारला ७० वर्षांत करता आले नाही, असे ऐतिहासिक लोककल्याणकारी निर्णय घेण्याचे धारिष्ट्य पंतप्रधान मोदी यांनी दाखविले आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत मोदीजींचे हात पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी, तसेच कऱ्हाड दक्षिणेतून अतुलबाबांना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मजबूत संघटन उभारावे.

या वेळी कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, सयाजी यादव, निवासराव थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, दुशेरेचे सरपंच आनंदा गायकवाड, उपसरपंच हणमंत जाधव, कार्वेचे सरपंच संदीप भांबुरे, उपसरपंच रोहित जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT