Jaykumar Gore-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil VS Gore : मोहिते पाटलांनी उडवली गोरेंची खिल्ली : 'क्रॉस वोटिंग ओळखला ते काय मिस्टर इंडिया आहेत का?'

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 14 June : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूरमध्ये मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. महापालिका नगरसेवकांच्या समोर बोलताना पालकमंत्री गोरे यांनी ‘क्रॉस वोटिंग’ करू नका, मला ते ओळखतं येतं’ असा इशारा दिला होता. त्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्र्यांची खिल्ली उडवत ‘ते काय मिस्टर इंडिया आहेत का?’ असा सवाल केला आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोलापूर मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. भाजपकडे बहुमत असले तरी गुप्त मतदान प्रक्रियेमुळे ‘क्रॉस वोटिंग’ची भीती कायम आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला आव्हान दिले आहे. वसंतराव देशमुख उमेदवार असले तरी खरी लढत ही मोहिते पाटील आणि गोरे यांच्यात आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांची ताकद अजमावली जात आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना क्रॉस वोटिंग करू नका, ते मला समजते, असा इशारा भाजपच्या नगरसेवकांना दिला होता. त्यावरून खासदार मोहिते पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांची खिल्ली उडवत ‘क्रॉस वोटिंग ओळखायला ते काय मिस्टर इंडिया आहेत का?’ असा सवाल केला आहे.

पालकमंत्र्यांची भूमिका प्रत्येक वेळी बदलते, कधी ते मंत्री, कधी पोस्टमन, तर कधी ज्योतिषी असतात. त्यामुळे ते नक्की कोणत्या भूमिकेत आहेत, हे त्यांनी ठरवावं. आपण केलेले मतदान कोणालाही समजत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सद्‌सदविवेक बुद्धीने मतदान करावे. क्रॉस वोटिंगबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे, धमकाविण्याचे प्रकार घडत आहेत, त्याबाबत मी सोलापूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवणार आहोत, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT