

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असतानाच बेळगावच्या मुद्द्यावर भाजप खासदार जगदीश शेट्टर यांनी मोठे वक्तव्य करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
बेळगाव हे कर्नाटकाचाच भाग आहे आणि म्हणूनच येथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते, असे ठामपणे सांगत त्यांनी सीमाप्रश्नावर नव्याने ठराव मांडण्यामागील औचित्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खासदार शेट्टर म्हणाले की, कर्नाटक (Karnataka) विधानसभेत यापूर्वीच कळसा-भांडुरा नाला प्रकल्पासंदर्भात दोन ठराव मंजूर झाले आहेत. मात्र त्या ठरावांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत सीमावादासंदर्भात पुन्हा ठराव मांडून नेमके काय साध्य होणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
बेळगाव महापालिकेत भाजपची (BJP) सत्ता असताना बेळगाव हा कर्नाटकाचा भाग आहे, असा ठराव सभागृहात का मंजूर केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होताच शेट्टर यांनी भूमिका स्पष्ट केली. महापालिका सभागृह आणि अधिकाऱ्यांकडून सरकारकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असून अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी बेळगावमधील सामाजिक वातावरणाचाही उल्लेख केला. बेळगावमध्ये मराठी आणि कन्नड भाषिक नागरिक अनेक दशकांपासून सलोख्याने राहत आहेत. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
महापालिकेतील ठरावाबाबत लवकरच महापौरांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
दरम्यान, भाजपला मराठी भाषिकांची मते गमावण्याची भीती असल्यामुळेच महापालिकेत हा ठराव मंजूर केला जात नाही का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर शेट्टर यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. मराठी भाषिक पाकिस्तानात राहत नाहीत, ते भारतातच राहतात. मराठी, कन्नड आणि इतर भाषिक नागरिक इथे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, असे म्हणत त्यांनी या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.