Dhairyasheel Mohite Patil-Jayshinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha Constituency : माढ्याची रंगीत तालीम जिंकली; मोहिते पाटील आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार का?

Loksabha Election 2024 : माढा लोकसभेची रंगीत तालीम मोहिते पाटील यांनी मोठ्या मार्जिनने जिंकली आहे, त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. माढ्यातून भाजपच्या तिकिटासाठी मोहिते पाटील प्रचंड आग्रही आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढा लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिलेल्या सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मोहिते पाटलांनी एकतर्फी आणि मोठ्या मार्जिनने जिंकली. याच निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत बोलताना अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आता भाजपने तिकीट नाकारले तरी मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळशिरस (Malshiras) तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची (Shankar Sugar Factory) पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या निवडणुकीत कारखान्याच्या २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे कारखान्यावर मोहिते पाटील यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, उर्वरित ६ जागांसाठी मतदान झाले होते. या सहा जागांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जयसिंह मोहिते पाटील (Jayshinh Mohite Patil) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha Constituency ) बहुतांश तालुके आहेत. त्यामुळे कारखान्याची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. त्यामुळे कारखान्याची निवडणूक गांभीर्याने घ्या, असे आवाहन जयसिंह मोहिते पाटील यांनी केले होते. तसेच, कोणी लढो अथवा न लढो मी स्वतः माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे, असे विधान केले होते. त्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रंगली हेाती.

मोहिते पाटील गटाचे सहा उमेदवारही सरासरी साडेतीन हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शंकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया या निवडणुकीतील विजयानंतर उमटत हेात्या.

दरम्यान, माढा लोकसभेची रंगीत तालीम मोहिते पाटील यांनी मोठ्या मार्जिनने जिंकली आहे, त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. माढ्यातून भाजपच्या तिकिटासाठी मोहिते पाटील प्रचंड आग्रही आहेत.

टेंभुर्णीत काल झालेल्या निरीक्षकाच्या बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. या आता भाजपकडून तिकीट कोणाला भेटते, हे पाहावे लागेल. भाजपने जर विद्यमान खासदार निंबाळकर यांना तिकीट दिले तर मोहिते पाटील काय भूमिका घेणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT