Umesh Patil-Ajinkyarana Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politic's : मोहोळचं राजकारण पुन्हा पेटलं; उमेश पाटलांचा अजिंक्यराणा पाटलांवर पलटवार, म्हणाले, ‘बैलगाडीखाली कुत्रं नव्हे...’

Umesh Patil Reply to Ajinkyarana Patil : अजित पवार यांनी केलेल्या टीकेचं वाईट वाटलं नाही. कारण, बैलगाडीखाली कुत्रं आहे की वाघ हे दाखवण्याची संधी मला त्यानिमित्ताने मिळाली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 February : विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेले मोहोळचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना उमेश पाटील यांना कुत्र्याची उपमा दिली होती. त्याला उमेश पाटील यांनी सणसणीत उत्तर दिलं असून ‘बैलगाडीखाली कुत्रं नव्हतं, तर वाघ होता, हे निकालातून दिसून आलं आहे,’ अशी चपराक उमेश पाटलांनी अजिंक्यराणांना लगावली.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मोहोळमधील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली होती. त्यानंतर उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार राजू खरे यांचे काम करून त्यांना निवडून आणले होते. त्यानंतर मोहोळमधील राजकारण शांत होते. मात्र, राजन पाटील आणि उमेश पाटील गटात धुसफूस सुरू होती.

काही दिवसांपूर्वी उमेश पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या वेळी त्यांनी आपण अजित पवार यांना सोडले नव्हते, असा दावा केला होता. माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना उमेश पाटील यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली होती.

उमेश पाटील हे अजितदादांकडे का आले आहेत माहिती आहे का, असा सवाल करत ‘त्यांना कुठं घेतलंच नाही.’ आपल्या कुठं घेईनात म्हटल्यावर ते अजितदादांकडे गेले. ‘झालं जाऊ द्या, आम्हाला पक्षात परत घ्या’, अशी त्यांनी विनंती केली. मग अजितदादा म्हणाले, परत येतंय कुत्रं, तर घ्यावं गाडीखाली’ असे वक्तव्य अजिंक्यराणा पाटील यांनी केले होते.

अजिंक्यराणा पाटील यांच्या टीकेला उमेश पाटील यांनी खरमरीत उत्तर दिले. ते म्हणाले, अजित पवार यांनी केलेल्या टीकेचं वाईट वाटलं नाही. कारण, बैलगाडीखाली कुत्रं आहे की वाघ हे दाखवण्याची संधी मला त्यानिमित्ताने मिळाली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजितदादांच्या लक्षात आलं की अरेरे बैलगाडीखाली तर वाघ होता. बैलगाडी ओढणारे जे बैल असतात ना, ते लय माज मस्ती, ढुसण्या मारायला लागले की त्याला सांड करण्यासाठी जनावरांचा डॉक्टर त्याला ट्रीटमेंट देतात. त्याला आडवं पाडून त्याचा कार्यक्रम करतात, मग ते गुपचूप नाकासमोर चालतं.

बैलगाडी ओढणारी जी बैलं आहे, ती म्हातारी झालेली आहेत आणि खरा वाघ तर बैलगाडीखाली होता, तो आपल्याला दिसलाच नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र अजित पवार यांच्या लक्षात आलं. मग ते वाघासारखा कार्यकर्ता कसा सोडतील, असा सवालच उमेश पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT