Rajan Patil : अजितदादांचे माजी आमदार राजन पाटलांचं थेट सुशीलकुमार शिंदेंना आवाहन; म्हणाले, दिलीप मानेंना...

Rajan Patil News : महायुतीत असलेले राजन पाटील काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यासह राजन पाटील यांनी दिलीप मानेंबद्दल केलेल्या विधानाची चर्चा होत आहे.
sushilkumar shinde dilip mane rajan patil.jpg
sushilkumar shinde dilip mane rajan patil.jpgsarkarnama
Published on
Updated on

अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राजन पाटील शनिवारी ( 3 ऑगस्ट ) थेट काँग्रेसच्या स्टेजवर दिसले. महायुतीत असलेले राजन पाटील काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. निमित्त होतं दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाचं. यावेळी राजन पाटील यांनी दिलीप माने यांना उद्देशून केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे.

"दिलीप माने यांना दोन-तीन महिन्यांत आशीर्वाद द्यावा," असं आवाहन राजन पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde ) आणि तेथील जनतेला केलं. एकप्रकारे आशीर्वादाच्या रूपानं दिलीप माने यांना विधानसभेत पाठवा, असं राजन पाटील यांना सांगायचे होते.

दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने ( Dilip Mane ) यांचा वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, उज्वला शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, सुरेश हसापुरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

sushilkumar shinde dilip mane rajan patil.jpg
Dilip Mane : प्रणिती शिंदेंनी दिलीप मानेंचे कौतुक करताच सुरेश हसापुरे व्यासपीठावरून उठून गेले...

राजन पाटील ( Rajan Patil ) म्हणाले, "दिलीप माने यांची ही तिसरी पिढी या भागात समाजकारण करत आहे. दिलीप माने राजकारणात आल्यापासून माझी आणि त्यांची मैत्री आहे. आम्ही दोघांनी विधानसभा, जिल्हाबँक आणि सहकारात काम केलं आहे. ब्रह्मदेवदादा माने यांचा वारसा पुढे नेण्याचं काम दिलीप माने करत आहेत."

"ब्रह्मदेवदादा माने यांनी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलला ऑपरेशनला न्यायचं होते, त्याच्यापूर्वीही त्यांनी रिक्षावाल्यांच्या संपासाठी आंदोलन केलं होतं. सत्ता असो किंवा नसो समाजासाठी काम करायचं म्हणून या मंडळींनी कधीही तडजोड केली नाही. त्याच कुटुंबातील दिलीप माने अतिशय जिद्दीनं काम करत आहेत," असं राजन पाटलांनी सांगितलं.

sushilkumar shinde dilip mane rajan patil.jpg
Praniti, Sushilkumar Shinde : मानेंना ताकद देण्याचा सुशीलकुमार अन्‌ प्रणितींचा शब्द; पण ‘त्या’ चुकीचीही करून दिली जाणीव!

"दिलीप माने यांनी त्यांचं वय मला कधीच सांगितलं नाही. आज मी बघितलं तर ते 62 वर्षांचे झाले आहेत. पण, 62 वर्षांचे वय असताना सुद्धा 23 वर्षांच्या तरूणाला लाजवेल, असं काम ते करतात. तसेच, सुशीलकुमार शिंदे आणि सगळी जनता येथे आहे. येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत तुम्ही सगळ्यांनी दिलीप माने यांना आशीर्वाद द्यावा," असं आवाहन राजन पाटील यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com