MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवारांच्या माध्यमातून मनरेगाची सर्वाधिक कामे

नीलेश दिवटे

Rohit Pawar : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्यात जामखेड आणि कर्जत हे दोन तालुके अनुक्रमे प्रथम व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही तालुक्यात मिळून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची अशी 21 कोटींची 5 हजारांहून अधिक विकास कामे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.

रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरत आहे. शिवाय यातून सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरुपाची कित्येक कामे पूर्ण करता येतात, हे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात दाखवून दिले आहे. प्रत्येक सरकारी योजनेचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकाधिक लोकांसाठी पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

‘रोहयो’च्या माध्यमातूनही जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यात अनेक कार्यशाळा घेतल्या. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत करायच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले.

आमदार रोहित पवार यांचे वैयक्तिक लक्ष आणि प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, दोन्ही तालुक्यांचे बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनामुळे कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके ‘रोहयो’ अंतर्गत केलेल्या कामांमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहेत.

शिवाय नागरिकांने रोजगाराची मागणी केल्यानंतर त्याला तत्काळ रोजगारही उपलब्ध करुन दिला जातो आणि शिवाय पंधरा दिवसात पैसेही अदा केले जातात. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहिरी, शोषखड्डे, घरकूल ही जामखेड तालुक्यात 10.85 कोटी रुपयांची तर कर्जत तालुक्यात 9.95 कोटी रुपयांची कामे करण्यात आली.

रोहयोच्या माध्यमातून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आणि अधिकाधिक सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रशासनाकडून त्यासाठी सहकार्य मिळत असल्याने मतदारसंघात कामे करता आली. भविष्यातही प्रत्येक योजनेचा मतदारसंघातील अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरुच राहतील.

- रोहित पवार, आमदार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT