Solapur, 11 July : माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (सरकारनामा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही). ते माळशिरस पंचायत समितीमधील एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याचे ऐकू येत आहे. मोहिते पाटील यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मागील काही काळापासून राज्यातील लोकप्रतिनिधींकडून शिवराळ भाषा वापरली जात आहे. अनेकजण समोरच्याला शिवीगाळ करताना आढळून आले आहेत. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार दिलेली धमकी ताजी असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील खासदाराचा एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होताना दिसून येत आहे.
खासदार धैर्यशील माेहिते पाटील यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला त्यांचे पीए बोलताना दिसून येत आहे. ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार ‘हॅलो, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आपल्याशी बोलणार आहेत, देतो साहेबांकडे,’ असे सांगून ते फोन खासदार मोहिते पाटील यांच्याकडे देताना दिसून येत आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे फोन दिल्यानंतर ते अधिकाऱ्याला हॅलोऽऽ म्हणताच समोरची व्यक्ती ही खासदारांना नमस्कार भैय्यासाहेब, असे म्हणते, तोच मोहिते पाटील म्हणतात, ‘शिवराजला पाठवतो, तुझ्याकडे...ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं,’ असे सांगतात.
मोहिते पाटील यांनी वरील निर्देश दिल्यानंतर संबंधित व्यक्ती ही आपण सोलापूरमध्ये असल्याचे सांगत आहे. त्यावर चिडलेल्या खासदार मोहिते पाटील यांनी समोरच्या व्यक्तीला मादXXXX घेऊन यायचं समजलं ना, उद्या सकाळी. नाही तर पंचायत समितीत येऊन हातपाय तोडीन, समजलं का?, अशी धमकी देताना दिसून येत आहेत.
ऐ मादXXXX ऐकू येतंय का तुला... समोरची व्यक्ती ही हतबल स्वरात भैय्यासाहेब...मी सोलापुरात आहे...असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यानंतरही दरडावण्याच्या स्वरात उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख मी तुला दाखवतो, अशी धमकी देताना खासदार मोहिते पाटील यांचा आवाज ऐकू येताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.