MP Sadashiv Lokhande and Railway Minister Ashwini Vaishnav
MP Sadashiv Lokhande and Railway Minister Ashwini Vaishnav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadashiv Lokhande : खासदार लोखंडेंचे बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे

विनायक दरंदले

सोनई ( जि. अहमदनगर ) - राज्यात शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात गेले. त्यात शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेत तीव्र नाराजी असली तरी ते मात्र मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीत प्रयत्न करत आहेत. शिवसेनेकडून शिर्डी लोकसभेसाठी माजी मंत्री बबन घोलप यांचे संकेत आल्याने खासदार लोखंडे यांच्या दृष्टीने रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे ठरणार आहे. लढत जिवंत ठेवण्यासाठी 'भाजप' कडून निधीला हिरवा कंदील मिळेल अशी शक्यता आहे. ( MP Lokhande submits to Railway Minister for Belapur-Parli railway line )

मागील अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असलेल्या बेलापूर-परळी नव्या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने पटरीवर यावा याकरीता 'शिर्डी' चे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे घातले आहे. रखडलेल्या कामास प्राधान्य देण्याचे आश्वासन मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याने या भेटीला विशेष महत्त्व समजले जात आहे. दिल्ली भेटीत लोखंडे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना रेल्वे मार्गाचे काम सुरू होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे सांगून याबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असल्याचे सांगितले. बेलापूर - परळी रेल्वे मार्गाच्या सर्व्हेसाठी दोन कोटी 75 लाख रुपये खर्च केलेले आहेत. पाथर्डी ते बीड हा डोंगर-दऱ्याचा भाग असल्याने अधिक निधीची गरज आहे, असे लक्षात आणून दिले.

बेलापूर-परळी मार्गावर रेल्वे सुरु झाल्यास दळणवळणाची मोठी समस्या सुटणार आहे. याबाबतच्या सर्व अडचणी व आवश्यक बाबी सांगितल्यानंतर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी तांत्रिक अडचणी दूर करुन कामाला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे लोखंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT