Satara Shivsena News : गेल्या २५ वर्षापासून युतीच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनाचा राहिला आहे. यामुळे महायुतीत या मतदारसंघाचा उमेदवार शिवसेना शिंदे गटाचाच असणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला असता चांगले वातावरण असून या मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार निवडून येईल, असा दावा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषाोत्तम जाधव व निरीक्षक शरद कणसे यांनी केला आहे.
शिंदे गट शिवसेनेच्यावतीने Shivsena जिल्हा प्रमुख पुरुषाोत्तम जाधव Purushottam Jadhav व निरीक्षक शरद कणसे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दाोघांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी दाोघांनीही सातारा लाोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच असून येथून आम्ही उमेदवार देऊन ताो निवडून आणणार आहोत, असे स्पष्ट केले.
निरीक्षक शरद कणसे म्हणाले, जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी पात्र उमेदवार म्हणून शिवसेनेत अनेक चेहरे आहेत. पक्षाच्या आदेशानुसार ज्याला संधी मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नव्याने १५ ते १६ हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे.
पक्ष बांधणी वाढली पाहिजे, सदस्य नोंदणी, शिवदुत यांची संख्या वाढवण्यासाठी विधानसभा मतदार संघात भेटीगाठी घेऊन आढावा घेतला आहे. प्रत्येक गावात शाखा असली पाहिजे म्हणून गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवत आहोत. प्रत्येक मतदार संघात चांगले वातावरण आहे.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, २००९ ला लोकसभा मतदार संघाची निवडणूक मी लढलो. २०१९ च्या पोट निवडणुकीमुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला होता. आता जे उमेदवार निवडणूक आले. ते फक्त १ लाखांच्या फरकांनी निवडून आले आहेत. यामुळे पक्षाचा जो आदेश असेल त्यांचे पालन करणार, जर उमेदवार म्हणून पुन्हा संधी दिली तर निवडणूक लढविणार आहे. चेहरे जरी अनेक असले तरी महायुतीत ज्याला तिकीट मिळेल त्यांचे काम करणार आहोत.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.