Satara Political News : उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश; राज्यातील ४५० 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीची लॉटरी

Girish Mahajan गिरिष महाजन यांनी वर्णे आबापूरी तीर्थक्षेत्राकरीता ५ कोटी देण्‍याची मागणी मान्‍य करत राज्‍यातील इतर सर्वच तीर्थक्षेत्रांच्‍या निधीत वाढ करण्‍याच्‍या सुचना केल्‍या.
Udayanraje Bhosale, Girish Mahajan
Udayanraje Bhosale, Girish Mahajansarkarnama
Published on
Updated on

MP Udayanraje Bhosale News : वर्णे आबापूरीसह ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची २ कोटींची निधीमर्यादा सरसकट ५ कोटी करावी, अशी मागणी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरिष महाजन यांच्‍याकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. या मागणीनुसार मंत्री गिरिष महाजन यांनी धोरणात्मक निर्णय घेत राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखडयाची मर्यादा पाच कोटींपर्यंत वाढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील ४५० हून अधिक ब वर्ग तीर्थक्षेत्रांना फायदा हाोणार आहे.

याबाबत खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्‍यावतीने दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे कि, वर्णे आबापूरी या ब वर्ग तीथक्षेत्र गावाच्या विकासाचा ५ कोटींच्या विकास आराखडा शासनास देण्‍यात आला होता.

यानुसार गिरीष महाजन Girish Mahajan यांची नुकतीच भेट घेत वर्णे आबापूरीचे आध्यात्मिक महत्त्‍व त्‍यांच्‍या निदर्शनास आणून देत सर्वच ब वर्ग देवस्‍थानांच्‍या विकासासाठीचा २ कोटींचा निधी वाढवून ५ कोटी करण्‍याची मागणी केली. काही तीर्थक्षेत्रांना २ तर काही तीर्थक्षेत्रांना त्‍याहून अधिक निधी देण्‍यात आला असून असा दुजाभाव न करण्‍याचे आवाहनही त्‍यांना भेटीत केले.

त्यानुसार मंत्री गिरिष महाजन यांनी वर्णे आबापूरी तीर्थक्षेत्रा करीता ५ कोटी देण्‍याची मागणी मान्‍य करत राज्‍यातील इतर सर्वच तीर्थक्षेत्रांच्‍या निधीत वाढ करण्‍याच्‍या सुचना केल्‍या. दिल्‍ली येथील अधिवेशनादरम्‍यान आवर्जुन फोनव्‍दारे हा निर्णय घेतल्‍याबद्दल दुरध्‍वनीवरुन संपर्क करत आभार मानले.

याच मागणीबाबत गिरीष महाजन यांना निवेदन देतेवेळी उदयनराजे यांच्‍यासमवेत माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, प्रविण धस्‍के, सचिन नलवडे, मंदार खळदकर आदी उपस्‍थित होते.

Edited By Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale, Girish Mahajan
Satara Loksabha : '' ...त्यामुळे सातारा लोकसभा जागेवर आमचाच अधिकार'' ; शिंदे गटाचा दावा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com