Ramraje Vs Ranjeetsingh Naik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Vs Ranjitsinh Naik : 'खासदार निंबाळकर हे तर आमदार गोरेंचे PA'; रामराजेंनी साधला निशाणा!

Ramraje Naik Nimbalkar News : सध्या फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोपही केला आहे.

उमेश भांबरे :सरकारनामा

Phaltan News : फलटणमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे जयकुमार गोरेंचे PA आहेत. जयकुमार गोरे पुढे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर मागे चालतात. माणमध्ये तर त्यांना आमदाराचे 'पीए' असंच म्हणतात, अशा शब्दांत रामराजेंनी खासदार निंबाळकर व आमदार गोरेंवर निशाणा साधला आहे.

'सध्या फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण केली जात आहे. कार्यकर्त्यांंनी साधी सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी धमक्या देऊ लागले आहेत. ते बोलले तरी त्याला कोणीही उत्तर देत नाहीत. सगळ्या तालुक्यात तीच परिस्थिती आहे. इतकी बोलले जाते की, साधी शंभर लोक या माणसाकडे नाहीत. एकमेव देशातला खासदार बघितला नाही की आमदार पुढे बसलाय आणि खासदार मागे बसलाय. त्या आमदारचा पीए आहे, हा आपला खासदार, माणमध्ये असेच म्हणतात,' असं रामराजेंनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय, 'जयकुमार गोरे पुढे तर रणजितसिंह निंबाळकर मागे असतात. पवारांच्या सभेवेळी देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, म्हणून माझ्याकडे वाड्यात आले. त्यांना बघवले नाही. जयकुमार गोरेंचे तोंड एवढे खराब झालेले मी पहिल्यांदा पाहिले. फलटणमध्ये कार्यकर्त्यांवर दहशत असून साधी सोशल मीडियावर पोस्ट टाकली तरी धमक्यांचे फोन येत आहेत. त्यांना आमची मते नको असतील आम्ही नोटाला मतदान करू,' असा इशारा रामराजेंनी (Ramraje Naik-Nimbalkar) दिला.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी (Ranjitsinh Naik Nimbalkar) राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचे निशाण फडकावले होते. आक्रमक वक्त्तृत्वशैली, मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना ओळखले जाते.

मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची विशेष दखल घेतली जात आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकर यांच्याच नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT