NCP MLA Disqualification Case : ...म्हणून 'मातोश्री'प्रमाणे शरद पवारांच्या हातून पक्ष, चिन्ह जाण्याची भीती!

NCP Sharad Pawar Group : 'ही' एक चूक शरद पवार गटाला फार महागात पडणार असल्याचं सध्या दिसत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

संजय परब

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आपत्रेतेच्या पाहिल्याच दिवशी झालेल्या सुनावणीचा एकूण रागरंग पाहता 'मातोश्री'प्रमाणे शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पक्षांतर्गत निवडणूक झाली होती, मात्र त्याची कागदपत्रे गहाळ झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साक्ष देताना सांगितल्याने पहिल्या फेरीतच शरद पवार गट चितपट होऊन अजित पवार गटाची सरशी झाल्याचे पाहायला मिळाले.

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंगळवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम सुरू झालं. यावेळी आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे कदाचित शरद पवार यांच्या हातून पक्ष तर जाणार नाही ना? अशी भीती निर्माण झालीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
NCP Mla Disqualification case : राष्ट्रवादीची 'ती' महत्त्वाची कागदपत्रे गेली कुठे? पक्षाकडून आक्षेप नाही

ही सुनावणी सुरू असताना शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण ताजे आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात उद्धव ठाकरे यांचे आमदार आजघडीला अपात्र झालेले नसले, तरी या घटकेला मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गेला आहे. विशेष म्हणजे त्याआधी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, याकडे लक्ष वेधले होते. ते या चाचणीला सामोरे गेले असते तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आम्ही जसंच्या तसं बहाल केलं असतं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

तेव्हाची परिस्थिती पाहता राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेशच चुकीचा होता, असं म्हणत कोर्टाने तत्कालीन राज्यपालांना फटकारलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हीच या प्रकरणातील मोठी चूक ठरली. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने थेट निकाल न घेता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आदर करीत त्यांच्याकडे सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले.

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रकरण नसले तरी पक्षांतर्गत निवडणुकीची कागदपत्रे हाती नसतील, तर त्यांचा टिकाव कसा लागणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे तुमचा पक्ष ओरिजनल असेलसुद्धा, पण तो आहे की नाही फक्त बोलून सिद्ध होणार नाही. आधी कागदपत्रे दाखवा आणि नंतर बोला, असा कळीचा मुद्दा आहे. शरद पवार हे पक्षात मनमानी करायचे आणि ते अंतर्गत निवडणुका न घेता आपल्या मनाने नियुक्त्या करायचे, असे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केले आहेत.

Sharad Pawar
NCP MLA Disqualification Case : आव्हाडांना अध्यक्षांनी फटकारलं अन् गप्प केलं; नेमकं काय घडलं?

निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. त्याचबरोबर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरही सुनावणी सुरू आहे. आता हाती कागदपत्रे नाहीत आणि अजित पवार गटाचे आमदार सुनावणीसाठी आले तर आमचाच पक्ष हा मूळ असल्याचे सांगतील आणि तशी कागदपत्रेसुद्धा सादर करतील. पण, याचवेळी मात्र शरद पवार गटाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समोर येऊन त्यांच्या हाती काही एक पुरावे नसतील. याचा फटका त्यांना बसू शकतो. या एका मुद्द्यावरून अजित पवार गट शरद पवार गटाला घेरण्याची चिन्हं दिसत आहेत. त्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी बघायला मिळाला आहे.

सुनावणीत पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. यावर आव्हाड म्हणाले, “पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. मात्र सुरक्षित कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही.” याचा अर्थ पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे शरद पवार गटाकडे नाहीत. त्यामुळे ते पुरावे आपल्याकडे ठेवण्यात शरद पवार गट कमी पडला. या चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि पक्षाचं नाव जातं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com