MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan : केंद्रीय जलशक्ती समितीवर रणजितसिंह निंबाळकर यांची निवड

Umesh Bambare-Patil

Phaltan News : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत महत्वपूर्ण अशा पाणी वाटप धोरण ठरवणाऱ्या समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी Specially invited members म्हणून निवड झाली आहे.

देशाच्या शेती व पाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे, यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्त्रोत्र ठरवणे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे, जलजीवन मिशन अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हर घर जल ही योजना राबवणे.

दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून कशा पद्धतीने ते वाहून जाणारे पाणी वापरता येईल, यावर अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून वाहून जाणारे पाणी कसे वापरता येईल, यावर अभ्यास करणे, केंद्र - राज्य यांच्यात समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे, असे महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम समितीतर्फे होते.

त्यावर खासदार निंबाळकर यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी निवड केली. या निवडीने महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला फायदा होईल. माढा मतदारसंघातील पिण्याच्या व शेती पाण्याचे उर्वरित प्रश्न या निवडीने निकाली निघतील. त्यांच्या निवडीमुळे मतदार संघात आनंदाचे वातावरण असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT