Mumbai News : फलटण तालुक्यासाठी (Phaltan) वरदान ठरलेल्या निरा देवघर प्रकल्पाचे पाणी धोम बलकवडीच्या कालव्यातून फलटण तालुक्यातीला मिळण्याच्या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. या प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी दिली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांच्या आढाव्यासाठी त्यासोबत इतर प्रश्नांची सोडवणूक होण्याच्या अनुषंगाने मंगळवार (दि. 31) रोजी सकाळी मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजी (बापू) पाटील, राहूल कुल, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, भाजपचे नेते जयकुमार शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कालवा जोड प्रकल्पाला मान्यता
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनूसार, खंडाळा तालुक्यातील वीरकवली या गावात असणार्या ओढ्याद्वारे निरा देवघर सिंचन प्रकल्पाचे पाणी धोम-बलकवडी सिंचन प्रकल्पाच्या कालव्यात आणून सोडण्याचा प्रस्ताव आपण शासनापुढे सादर केला होता. यामुळे निरा देवघरचे पाणी धोम बलकवडीच्या कालव्यात येणार आहे. परिणामी धोम-बलकवडीचा कालवा आठ माही वाहण्याची सोय होणार आहे.
सोबतच या प्रस्तावात खंडाळा तालुक्यातील वाघोशी, गावडेवाडी आणि शेखमीरवाडी येथील निरा देवघरच्या उपसा सिंचन योजनेचा देखील समावेश आपण केला होता. या प्रस्तावास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करत होते. पण, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत.
निरा देवघरसाठी तीन हजार दोनशे कोटी...
खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या या निर्देशामुळे निरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. खंडाळा तालुक्यातील निरा देवघर सिंचन प्रकल्पाचे लाभक्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी वाघोशी, शेखमीरवाडी व गावडेवाडी येथील उपसासिंचन योजना पूर्ण करणे गरजेचे होते.
त्यासोबतच धोम-बलकवडीच्या कालव्याद्वारे निरा देवघरचे आलेले हे पाणी फलटण तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. निरा देवघरचे धरण बांधून दशक उलटून गेले तरीही अद्याप कालवे पूर्ण होत नव्हते. आणि याचाच फायदा बारामतीला होत होता. आजच्या या निर्देशामुळे बारामतीला जादा जाणारे पाणी हे फलटण तालुक्यात वळवता येणार आहे. आगामी काळात निरा देवघरचे हेच पाणी आंदरुडमार्गे पुढे माढा मतदारसंघात म्हणजेच माळशिरस तालुक्यात जाण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.