Sanjay Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Patil News : टेंभू, म्हैसाळ योजनेसाठी निधी आणणार; संजय पाटलांनी सांगितला प्लॅन

Sangli News : सांगली तालुक्यातील सोडविणार पाण्याचा प्रश्न

सरकारनामा ब्यूरो

Sanjyakaka Patil : म्हैसाळ योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे आता टेंभू व म्हैसाळ योजनेच्या अपूर्ण कामासाठी केंद्र सरकारकडून निधी आणणार आहे. यामुळे पेड परिसरासह खानापूर, आटपाडी, खटाव आणि तासगाव तालुक्यातील गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

खासदार संजय पाटील (Sanjay Patil) म्हणाले, "म्हैसाळ योजनेसाठी ९८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेबाबत टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, टेंभू व म्हैसाळ योजनेचे काम अपूर्ण राहिले आहे. त्या कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाऊन निधी आणणार आहे. ही योजना पूर्ण करून पेड, खानापूर, आटपाडी व खटाव आणि तासगावातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे."

यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नाव न घेता आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना टोला लगावला. ते म्हणाले, "टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाचे जे काम झाले त्यात संजयकाकांचा वाटा मोठा आहे. संजय पाटील खासदार होते म्हणूनच हे घडले आहे. कोणीही कितीही म्हणू द्या आम्ही या योजनेचे जनक आहे. मात्र संजय पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे काम झाले आहे."

यावेळी जिल्हा परिषदेचे (Sangli) माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, माजी उपसरपंच मनोहर पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, प्रभाकर पाटील, अरुण बालटे, प्रदीप माने, सरपंच प्रियांका साठे, उपसरपंच अमोल शेंडगे, सचिन पाटील, हातनूरचे विलास पाटील, तानाजी पाटील, पांडुरंग जाधव, विनायक मासाळ, माजी सभापती विक्रम पाटील, नितीन नवले, नगराध्यक्ष राहुल गावडे, उमाजी सरगर, शशिकांत जमदाडे, बाबासाहेब पाटील, सिद्धनाथ जाधव आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT