Shahu Maharaj Chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur politics: लोकसभेला वर्ष होताच खासदार शाहू महाराज म्हणतात, "मोदी सरकारचा इंडिया आघाडीतील खासदारांशी संवाद कमीच"

MP Shahu Maharaj Criticizes Centre on Communication Gaps:कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे. या संदर्भातील कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली.

Rahul Gadkar

kolhapur News: केंद्र सरकारकडून विकासाचे उपक्रम राबवण्याचे काम सुरू आहे. आणखीन विकास कामे करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मात्र केंद्र सरकारकडून मला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.

केंद्र सरकारचा इंडिया आघाडीतील खासदारांची संवाद कमी आहे. मात्र काही मंत्री कोल्हापूरकडे विशेष लक्ष देऊन आहेत. त्यामुळे काही विकासकामे सुरू आहेत. सत्ताधारी लोक आपापले बघणार. पण पूर्णच डावलतात असे नाही. आज लोकसभा निवडणूक होऊन एक वर्ष झाले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, यंदा देखील 6 जून रोजी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला जाणार आहे, त्याची तयारी झाली असल्याची माहिती खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे. या संदर्भातील कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला.

ग्रामीण भागाच्या काही समस्या आहेत. कोल्हापूरचा विकास अजून रखडलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा हद्द वाढीला विरोध आहे. पण आज ना उद्या या प्रश्नाला पुन्हा तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे यातून मध्य मार्ग काढून हद्दवाढ करण्याचा निर्णय कोणावरही अन्याय न करता राज्य सरकारने घ्यावा, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT