Jasbir Singh: ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका युट्यबरच्या मुसक्या आवळल्या! ISIचा एजंट; तीन वेळा केली होती पाकिस्तानवारी

ISI Agent YouTuber Jasbir Singh Arrest Pakistan Visit:जसबीर सिंह हा ज्योती मल्होत्रा हीच्या माध्यमातून एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होता. त्यांच्या मोबाईलमधून वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत.
ISI Agent YouTuber Jasbir Singh Arrest
ISI Agent YouTuber Jasbir Singh Arrest Sarkarnama
Published on
Updated on

मोहाली: पंजाबमध्ये लपलेल्या पाकिस्तानी गुप्तहेरांना पोलिस शोधून काढत आहेत. पंजाब पोलिसांनी 24 तासात दुसरी मोठी कारवाई करीत आणखी एका यूट्यूबरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जसबीर सिंह असे त्याचे नाव असून 'जान महल'नावाचे त्याचे यूट्यूब चॅनेल आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेली पाकिस्तानी गुप्तहेर युट्यबर ज्योति मल्होत्रा हीच्या संपर्कात जसबीर सिंह होता.

पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI)अधिकारी शाकिर जट्ट रंधावा यांच्या संपर्कात तो होता. भारताविषयीची माहिती तो त्यांना पुरवत असल्याचे तपासात आढळले आहे. तो माहोली येथील रूपनगरचा रहिवासी आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सोशल मीडिया एक्सवर जयबीर सिंह याला अटक केल्याची माहिती दिली आहे.

हरियाणा येथील यूट्युबर ज्योती मल्होत्रा, पाकिस्तानी नागरिक, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश यांच्याशी जसबीर सिंह संपर्कात असल्याचे आढळले आहे. दानिश इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) शी निगडीत आहे.

जसबीर सिंह हा ज्योती मल्होत्रा हीच्या माध्यमातून एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होता. त्यांच्या मोबाईलमधून वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत.

ISI Agent YouTuber Jasbir Singh Arrest
Maharashtra Crime: लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यास फडणवीस सरकार ठरलं अपयशी

पाकिस्तानी गुप्तहेरांचे मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे सापडले आहेत. हे क्रमांक त्याने वेगवेगळ्या नावानं सेव्ह केले होते. दानिश याच्या निमंत्रणावरुन जसबीर सिंह हा तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आला आहे. तेथे त्याने पाकिस्तानी अधिकारी आणि युट्यूबर यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ज्योती मल्होत्रा हीच्या अटकेनंतर जसबीर सिंह याने अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे. त्याला आज मोहाली येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. चौकशी त्यांच्याकडून अधिक माहिती मिळेल, असे मोहाली पोलिसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com